कोथरुडमध्ये प्रेम प्रकरणातून 23 वर्षीय नागेश जाधवची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर नागेशच्या बहिणीने दोन वर्षांपासून नागेशचे संबंधित मुलीसोबत फोनवरुन बोलणं बंद केलं होतं, असा दावा केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : कोथरूडमध्ये प्रेम प्रकरणातून 23 वर्षीय नागेश जाधवची झालेली निर्घृण हत्या केवळ एका तरुणाचा जीव घेऊन थांबलेली नाही, तर एका गरीब कुटुंबाचा आधारच हिरावून गेला आहे. घरातील एकमेव कमावता मुलगा असलेला नागेश आई आणि आजीचा आधार होता. त्याच्या कमाईवरच घर चालत होते. मात्र आता नागेशच्या मृत्यूनंतर त्याची आई अक्षरशः एकटी पडली असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोथरूड परिसरात घडलेल्या या घटनेत नागेश जाधव याला अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवरून मेसेज करून बोलावण्यात आले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी नागेशला घेरत बांबू, लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत नागेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
नागेशच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी नागेश आणि त्या अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यावेळीही वाद झाले होते आणि प्रकरण पोलीस चौकीपर्यंत गेले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी नागेशचे सिमकार्ड तोडून टाकले आणि दोघांमधील संपर्क पूर्णपणे बंद झाला होता. नागेशही दुसरीकडे काम करू लागला होता. मात्र अचानक घटनेच्या दिवशी मुलीच्या मोबाईलवरून त्याला मेसेज आला आणि तो तिला भेटण्यासाठी गेला.
नागेशच्या बहिणीने सांगितले की, “मी नागेशला व्हिडिओ कॉल केला होता. त्या वेळी तो काळा-निळा झाला होता. त्याला प्रचंड मारहाण होत होती. मी त्यांना ‘दादा, माझ्या भावाला सोडा’ अशी विनंती करत होते, पण त्यांनी ऐकले नाही. ते त्याला मारतच राहिले.”
“त्या प्रकरणात नागेशचा कोणताही संबंध नव्हता, हे आम्ही वारंवार सांगत होतो. तरीही त्यांनी नागेशचा जीव घेतला,” असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नागेशला मारहाण झाल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तास त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले गेले नाही, तसेच त्याला तातडीने रुग्णालयातही नेण्यात आले नाही, असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान, नागेशच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात शोककळा पसरली आहे. वडिलांचे आधीच निधन झाले असून दोन बहिणींचे लग्न झाले आहे. घरात फक्त आई आणि आजी आहेत. घर चालवण्याची जबाबदारी पूर्णपणे नागेशवरच होती. त्यामुळे आता “आईचा सांभाळ कोण करणार? तिचं पुढचं आयुष्य कसं जाणार?” असा प्रश्न कुटुंबीय उपस्थित करत आहेत. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत “आम्हाला जिवाच्या बदल्यात जीव हवा. मुलीसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी नागेशच्या कुटुंबीयांनी केली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा