• Thu. Jul 23rd, 2026
    मोठी बातमी! मुंबईला रेड अलर्ट, मुसळधार पाऊस बरसणार, राज्यात कुठे काय परिस्थिती

    मुंबई: भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर, अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला आहे.

    आज सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. गेल्या अनेक तासांपासून मुंबईत विना खंड पाऊस बरसतो आहे. गेल्या काही तासात मुंबईत १०० मिमीच्या आसपास पाऊल पडला आहे. तर पुढील काही तास मुंबईत जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.
    चुकूनही विकेंडला लोणावळा जाऊ नका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील VIDEO पोस्ट करत व्यक्तीने दिला सल्ला
    या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
    राज्यात पावसाचा जोर वाढला

    राज्यात पावसाचा जोर वाढला आहे आणि पुढील पाच दिवस पावसाची कोसळधार सुरुच राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. या तुलनेत मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडतो आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेनं पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
    Maharashtra Weather Alert: धाकधूक वाढली, राज्यातील या जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed