Pune News: सध्या ही मुलगी वायसीएम रुग्णालयात सुरक्षित असून, वैद्यकीय व डीएनए तपासणीनंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे तिची बालगृहात रवानगी केली जाणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : आर्थिक विवंचनेला कंटाळून एका दाम्पत्याने आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला देहूजवळील भंडारा डोंगरावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली. कोणीतरी दानशूर अथवा चांगले कुटुंब मुलीला नेऊन तिचा सांभाळ करील, या भावनेतून हे कृत्य केल्याची कबुली संबंधित आई-वडिलांनी दिली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अजय शिवशंकर यादव (वय २३) आणि खुशबू अजय यादव (वय २२, दोघे रा. वासुली, मूळ उत्तर प्रदेश) या दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यादव दांपत्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहते. पती कामगार, तर पत्नी गृहिणी आहे. दारिद्र्याचे चटके मुलीला बसू नयेत म्हणून त्यांनी रविवारी (सहा सप्टेंबर) मुलीला डोंगरावर एकटेच सोडले. पोलिसांनी तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉ. प्रकाश कोयाडे यांनी या घटनेबाबत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली.
Pune Accident : शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंदरम्यान, सोमवारी सायंकाळी पश्चात्ताप झालेले आई-वडील स्वत:हून पोलिसांत हजर झाले. सुरुवातीला ही मुलगी मुंबईत सापडल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कृत्याची कबुली दिली.
या मुलीची रुग्णालयात देखभाल करण्यासाठी एक महिला पोलिस कर्मचाऱ्याला नेमण्यात आले होते. पत्रकारांनी या मुलीबाबत विचारले, तेव्हा या महिला पोलिसाला अश्रू अनावर झाले. कोणी असे कसे वागू शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Pune Crime : पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाणभंडारा डोंगरावर सोडलेल्या मुलीचे आई वडील पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. आर्थिक विवंचनेमुळे मुलीचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याने मुलीला सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू आहे.-विजयानंद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा