रायगड: खालापूर जवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. गेले तीन दिवस या ठिकाणी दिवसरात्र बचावकार्य सुरु आहे. मात्र, पर्यटकांनी केलेल्या अभूतपूर्व गर्दीमुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. या वाढणाऱ्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी निर्बंध घातले. बचाव कार्यात असलेले अधिकारी, बचाव कामगार, विविध स्वयंसेवी संस्था आणि खाजगी संस्थांसह, रोजंदारी कामगारांची संख्या सुमारे ५,००० इतकी असताना १५,००० हून अधिक लोक बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी उतरले आहेत. इर्शाळवाडीत मदत कार्यात सक्रीय असलेल्या अधिकाऱ्यांनी या घुसखोरीवर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याला “ सर्वात वाईट आपत्ती पर्यटन” असे म्हटले आहे.
नामराचीवाडी आणि नानिवली गावच्या रस्त्यावरील पायथ्याशी असलेल्या चौक ग्रामपंचायत सदस्याने पोलिसांच्या उपस्थितीत येणाऱ्यांची तपासणी केली आणि अनेकांना प्रवेश देत आत येऊ दिले. काही जण इतर मार्गाने घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफ, एनजीओ आणि डॉक्टरांच्या कामात अडथळा ठरणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी इर्शाळवाडीवरील नियंत्रण कक्षाला वारंवार घोषणा द्याव्या लागल्या. ४ किमी लांबी असलेल्या ट्रेकमध्ये अनेक जण खडकांवर बसून सेल्फी घेताना दिसून आले.

बा रायगड या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी चैत्राली कारेकर यांनी सांगितले की, पर्यटकांमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. एनजीओ आणि सरकारी एजन्सींमधील समन्वयक असलेल्या गुरुनाथ साठेलकर म्हणाले, “आम्ही १५,००० हून अधिक लोक पाहिले आहेत.” रायगड पोलिसांचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे म्हणाले की, “स्थानिक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या मदतीने निर्बंध लादण्यात आले आहेत. अनेकजण नातेवाईक आणि इतर विविध कारणांसाठी इर्शाळवाडीकडे येत आहेत. परंतू, पोलिसांनी तपास अधिक कडक केली आहे लवकरच आणखी निर्बंध लादले जातील, असेही त्यांनी सांगितले.