• Sat. Sep 21st, 2024

आर्थिक अडचणीमुळे दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात हळहळ

आर्थिक अडचणीमुळे दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात हळहळ

भंडारा/ यवतमाळ : आर्थिक अडचणीमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात घडली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील शेतकऱ्याने घरी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली.

काय घडलं?

बबन सोमजी नागोसे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घरातील सर्व जण शेतावर रोवणीच्या कामावर गेले असताना त्यांनी आत्महत्या केली. बबन नागोसे यांनी सेवा सहकारी सोसायटीमधून ७० हजार रुपयाचे कर्ज उचलले होते. हातउसणे म्हणून ५० हजार रुपये घेतले होते. या कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मोहरणा ग्रामपंचायतचे ते माजी उपसरपंच व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील बाबापूर येथे गुरुवारी सायंकाळी घडली. किशोर श्यामराव येरगुडे (वय ४०) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. बाबापूर येथे त्यांची शेतजमीन आहे.
धक्कादायक… राहत्या घरात सापडले ४ मृतदेह, खून की आत्महत्या? सातारा हादरलं
गुरुवारी सायंकाळी त्यांनी घरीच विषारी औषध प्राशन केल्याने प्रकृती बिघडली. घरच्यांनी त्यांना वणी येथील शासकीय रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. किशोर येरगुडे यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहे. किशोर गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीमुळे चिंतेत होते असे गावकऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed