या जवानांच्या पथकाला आज यश आले असून एका ४० वर्षीय महिलेला मातीच्या ढिगाऱ्या खालून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याचं वृत्त आलं होतं. त्या महिलेचं नाव आंबी बाळू पारधी असून ही महिला प्रवीण पारधी यांच्या घरातील आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खरी ठरलं असंच साऱ्यांना वाटलं. कारण, ३६ तासांपेक्षा जास्त काळ ही महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती पण, नशीब आणि सर्व देवाच्याच हातात आहे, असं समजून परशुराम निर्गुडे आणि त्यांचे कुटुंब आनंद साजरा करु लागले होते.
गुरुवारी दुपारीच आपल्या मनातील भावना व्यक्त करताना देवाची इच्छा, माझ्या मामाच्या घरातील किती व्यक्ती जिवंत आहेत, कुठे आहेत, हे सर्व देवावर सोडलं, असं बोलताना परशुराम निर्गुडेंना हुंदके दाटले. मात्र, ३६ तासांच्या जास्त कालावधीनंतर आंबी बाळू पारधी बाचाव पथकाला ढिगाऱ्याखाली अडकलेली दिसली. त्या जिवंत असल्याचं समजलं, पण नातेवाईकांना कानांवर विश्वास बसेना. भावनेच्या भरात अनेकांना फोन केले चौकशी केली.
पण, शेवटी परशुराम निर्गुडे यांच्या पदरी अपयशच आले. कारण, मामी जिवंत असल्याचं वृत्त खोटं होतं. मामी चा तर मृत्यु झाला आहे. आंबी पारधी यांच्या दिराने त्यांच्यावर अंत्यविधी केला होता. माझी मामी मनाने प्रेमळ होती, ती मृत्यूशी दिलेली झुंज देईल आणि मृत्यूलाही हरवू शकते, असा ठाम विश्वास आम्हाला होता. त्यात तिच्या हातात लहान लेकरू होतं. त्यामुळे देवाला दया येईल, असं वाटलं. पण, असं काही झालंच नाही. शेवटी आलेल्या जीवाला परत जाणं भागच आहे अशी आम्ही मनाला समजूत घातली.