• Sat. Mar 14th, 2026

    Rail Neer: रेल्वे स्थानकांवरील ‘रेल नीर’ झालं बंद, ठाणे ते कर्जतदरम्यान विक्री थांबवली; प्रवाशांसाठी खासगी बाटलीबंद पाण्याचा पर्याय

    Rail Neer: रेल्वे स्थानकांवरील ‘रेल नीर’ झालं बंद, ठाणे ते कर्जतदरम्यान विक्री थांबवली; प्रवाशांसाठी खासगी बाटलीबंद पाण्याचा पर्याय

    Mumbai Local: मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या रेल नीर या बाटलीबंद पाण्याची विक्री काही स्थानकांवर थांबवण्यात आली आहे. पुरवठा कमी होत असल्याने जुलैपर्यंत प्रवाशांना खासगी कंपन्यांच्या बाटल्या विकत घेऊन आपली तहाण भागवावी लागेल.

    मुंबई: मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मिळणारं रेल नीरचं बाटलीबंद पाणी आता उपलब्ध नसणार आहे. उन्हाळा सुरू झाला असून लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानकांवर ताटकळत उभं रहावं लागतं. यावेळी रेल नीरमुळे प्रवाशांना स्वस्त आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पण मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर आता रेल नीरची विक्री जुलै महिन्यापर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता खासगी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागणार आहेत.

    जूनपर्यंत पुरवठा बंद

    मुंबईसह उपनगरातील रेल्वे स्थानकांवर अंबरनाथ येथील कारखान्यामधून रेल नीरच्या बाटलीबंद पाण्याचं उत्पादन केलं जातं. पण आता मागणीनुसार बाटल्यांचा पुरवठा कमी होत असल्यामुळे काही रेल्वे स्थानकांवरील विक्री थांबवण्यात येणार आहे. अंबरनाथ प्लांट चालवणाऱ्या IRCTCने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. यानुसार 10 मार्च ते 30 जूनपर्यंत अनेक स्थानकं व ट्रेनमध्ये रेल नीरची विक्री थांबणार आहे. हे निर्बंध पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते सुरत आणि मध्य रेल्वेच्या ठाणे ते कर्जतदरम्यान रेल्वे स्थानकांवर हे बाटलीबंद पाणी मिळणार नाही. त्याऐवजी खासगी कंपन्यांचं बाटलीबंद पाणी विकत घ्यावं लागणार आहे.Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: जपानऐवजी भारतातच बनवणार देशातील पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिला टप्पा 2027मध्ये

    रेल्वेच्या आवारात खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर बंदी आहे. रेल नीरचे पाणी 14 रुपये प्रति लीटर विकले जात असून इतर खासगी कंपन्यांच्या बाटल्या 15 पासून अधिक दरात विकल्या जातात. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कर्जत-कसारा, हार्बरवरील सर्व स्थानकं आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार रेल्वे स्थानकांदरम्यान रेल नीर विकले जात आहे. यासाठी दररोज अंबरनाथमधून 14,500 कार्टन पुरवले जातात. इतकीच उत्पादन क्षमता आहे. प्रत्येक कार्टनमध्ये 12 बाटल्या असतात. उन्हाळ्याच्या दिवसात दररोज रेल्वे स्थानकांवर 4,500-5000 कार्टनपेक्षा जास्त बाटल्यांची मागणी होते. त्यामुळे रेल नीरचा तुटवडा होत आहे.

    Maharashtra TimesIndian Railway: रेल्वेतील खाद्यसेवा स्थगित होण्याची भीती; IRCTCच्या मुंबईतील किचनमध्ये गॅस तुटवडा

    नवीन लाइनसाठी मान्यता

    IRCTCकडून दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी पुरवठा 10 ते 12 दिवस कमी केला जातो. पण पहिल्यांदाच 3 महिन्यांसाठी विक्री बंद करण्यात आली आहे. दरम्यान, अंबरनाथमधील प्लांटमध्ये सध्या दुसऱ्या उत्पादन लाइनसाठी मान्यता देण्यात आली आहे. ही लाइन सुरू होताच दररोज, 29,000 बाटल्यांचं उत्पादन वाढणार आहे. या महिन्यात या लाइनसाठी काम सुरू करण्यात आलं असून एका वर्षात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा