• Mon. Nov 25th, 2024
    मोठी बातमी: पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

    मुंबई: गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. तर शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवले असून आपापल्या भागातील पावसाची परिस्थिती पाहून शाळांना सुट्टी घेण्याबाबत स्वत:च्या अखत्यारित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथील शाळांना सुट्टी असेल.

    गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार उद्या म्हणजे २० जुलै रोजी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याही पावसाचा जोर कायम राहील. त्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

    Mumbai Rains: रेल्वे स्थानकांवर गर्दीचा महापूर; प्रवाशांसाठी चहा-नाश्ता, घरी जाण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था

    राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढल्यास शाळांना सुट्टी दिली जाऊ शकते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकक्षेतील परिस्थिती विचारात घेता आपत्तीच्या पूर्वसूचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा तसेच त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकरण यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

    Rain Updates: सावधान! उद्याही मुसळधार पाऊस; रायगड, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, मुंबईला यलो अलर्ट

    गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

    राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी संध्याकाळी मंत्रालयात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    रेल्वे रुळावरच रखडली, ट्रॅकवरून चालताना ४ महिन्यांचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed