पाटील म्हणाले की, गेल्या वर्षापासून दोन पक्षांचं सरकार होतं. आता यामध्ये एक नवा पक्ष आला आहे. तिजोरीला एक चावी नसते. तिजोरीच आमच्याकडे आहे, तो प्रश्नच नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.मात्र, सरकार म्हणून जी कामे होणार आहेत आणि तिजोरी मध्ये जी आवक आहे राज्य सरकारच्या उत्पन्नामधून मिळते आणि कमी पडली तर केंद्र सरकारकडून मिळते, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले होते?
इंदापूर तालुक्यातील आठ दिवसाचे काम दोन दिवसात करून घेण्यासाठी मी गेलो होतो. मी दुसऱ्यांसारखा मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावायला गेलो नव्हतो. यामध्ये इंदापूर तालुक्याला काय मिळेल यासाठी मी गेलो होतो. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.आता जिल्ह्याची व राज्याची चावी देखील आपल्याकडे आहे, असे असे सूचक विधान राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात यांनी केले होते. यावेळी भरणे म्हणाले की, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या चाव्या देखील आपल्याकडेच आहेत. कारण आता आपल्याकडे युतीचे सरकार आहे. कुणी काहीही म्हंटले तरी शेवटी आपला राष्ट्रवादीचं पक्ष राहणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, असंही दत्तात्रय भरणे म्हणाले.