• Mon. Mar 9th, 2026

    Mumbai Airport: 400 मीटरसाठी 18000 रुपये! मुंबई विमानतळावर टॅक्सी-रिक्षाचालकांची दादागिरी; पोलिसांच्या कारवाईत 80 गुन्हे दाखल

    Mumbai Airport: 400 मीटरसाठी 18000 रुपये! मुंबई विमानतळावर टॅक्सी-रिक्षाचालकांची दादागिरी; पोलिसांच्या कारवाईत 80 गुन्हे दाखल

    Taxi and Rickshaw Drivers: मुंबई विमानतळावरून गेल्या काही महिन्यांत रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याविरुद्ध सहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

    मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या टॅक्सी व ऑटो रिक्षा चालकांवर सहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. परदेशी प्रवाशांची फसवणूक करून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेणाऱ्या चालकांना विरूद्ध खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. गेल्या दोन महिन्यात 80 एफआयआर दाखल केल्या आहेत.

    13 चालकांना अटक

    सहर पोलिसांनी 13 टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय 13 टॅक्सी जप्त करून अनेक चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. सहर पोलिसांकडे अशा दोन तक्रारी आल्यानंतर त्यांनी ही कठोर कारवाई सुरू केली. प्रवाशांना या टॅक्सी चालकांनी प्रवासाच्या मध्येच वाढीव भाड्याची मागणी केली होती. नकार देताच प्रवाशांना धमकी देत त्यांच्यावर दादागिरी केल्याची या प्रवाशांनी तक्रार केली होती.Maharashtra TimesMumbai AC Local: उन्हाच्या वाढत्या पाऱ्यासह ‘एसी लोकल’मध्ये फुकटेही वाढले! मध्य रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांमध्ये 23 टक्के वाढ

    2 मार्चला घडलेल्या घटनेत एका 28 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक करून त्याच्याकडून अधिक भाडं उकळण्याचा प्रयत्न केला. हा व्यावसायिक भुवनेश्वरवरून पहाटे 1.30 वाजता विमानतळावर दाखल झाला होता. सुरक्षा रक्षकाशी बोलताना रिक्षावाल्याने त्याला सेवन हिल्स रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी मीटरनुसार भाडं घेणार असं मान्य केलं. पण प्रवाशाकडून नंतर 500 रुपयांची मागणी करत पैसे देण्यास नकार दिल्यास मारण्याची धमकी दिली. प्रवाशाने नंतर तक्रार नोंदवली असून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. प्रकाश शेट्टी (42) या रिक्षाचालकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

    पोलिस अधिकाऱ्यांनाच धमकी

    यापूर्वी पहिली एफआयआर 25 फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली होती. एका महिला पोलिस आधिकाऱ्यांनी प्रवासी असल्याचं भासवत कुलाब्यासाठी टॅक्सीने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. पण या टॅक्सी चालकाने अधिकाऱ्यांकडून 1700 रुपयांची मागणी केली. सहर पोलिसांनी वैभव भोसले (34) या टॅक्सी चालकाला या प्रकरणात अटक केली आहे. एआसआय स्मिता पेडणेकर टॅक्सीमध्ये बसल्यावर त्यांना धमकी द्यायला सुरूवात केली. आरडाओरडो केला तर अजून 350 रुपये द्यावे लागतील अशीही धमकी टॅक्सी चालकाने त्यांना दिली. या दोन प्रकरणानंतर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली होती.

    Maharashtra TimesTraffic E-Challan: वाहतूकदारांना दिलासा मिळणार? थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव; राज्य सरकारकडे सादर

    दरम्यान, जानेवारी महिन्यातही असाच एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फक्त 400 मीटर अंतरासाठी एका टॅक्सी चालकाने परदेशी प्रवाशाकडून तब्बल 18000 रुपये भाडं आकरलं होतं. टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या या मनमानीवर आळा घालण्यासाठी ही कारवाई सुरू केली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा