• Mon. Nov 25th, 2024
    चंद्रपुरात ढगफुटी सदृश पाऊस; रस्ते जलमय, नागरिकांच्या घरात पाणीच पाणी

    चंद्रपूर: शहरात आज झालेल्या पावसाने शहरवासियांची दाणादाण उडाली. अवघ्या चार तासांत २४० मिलीलिटर पाऊस बरसला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले. शेकडो घरात पाणी शिरले. मागील दहा वर्षात असा पाऊस पहिल्यांदाच बरसल्याचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
    Maharashtra Rain Alert: मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुण्यात कोसळधार; आपत्ती निवारण कक्षाकडून हालचालींना सुरुवात
    या पावसाने महानगरपालिकेची पोलखोल ही केली. सकल भागात वस्ती असलेल्या नागरिकांना या पावसाच्या सर्वाधिक फटका बसला आहे. मागील तीन दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या पावसाने आज (मंगळवार) सकाळपासूनच रोद्र रूप धारण केले. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरात शिरलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांची कवायत सुरू झाली आहे. मान्सून आला मात्र, पावसाचे आगमन झाले नाही. यादरम्यान तुरळक पावसाची नोंद होत होती. यामुळे शेतकरी आणि सामान्यवर्गात चिंता व्यक्त करण्यात येत होती.

    अखेर आज वीजगर्जनेसह दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच हा पाऊस सुरू होता. मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन प्रभावित झाले आहे. आज सकाळपासूनच चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यावरून नदी पात्रासारखे पाणी वाहत आहे. ठक्कर कॉलनी, महसूल कॉलनीत पाणी शिरले आहे. गांधी चौकात असलेला शहरातील मुख्य गोलबाजार जलमय झाला आहे. सर्वत्र पाणी वाहत असल्याने वाहनाचा रांगाच रांगा दिसत. अद्यापही पावसाचा जोर ओसरला नाही. चंद्रपूर शहराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, तर ठक्कर, महसूल कॉलनीतील अनेक घरात पाणी शिरले आहे.

    गडचिरोलीत मुसळधार पाऊस, पुरामुळे दीडशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला

    चंद्रपूर जिल्ह्यात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार उद्या (बुधवार) चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना उद्याला (१९ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed