राज्यात आजपासून रिक्षांचे परवाने देण्यास स्थगिती देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळात रिक्षाचे परवाने देण्याबाबत योग्य नियमावली बनवण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्षाचे परवाने देण्यात येणार आहेत. तोपर्यंत आता रिक्षाच्या परवान्यांचे वाटप केले जाणार नाहीत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात रिक्षा परवाना देण्यास आजपासून स्थगित करण्यात आले आहे. याबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत योग्य ती नियमावली तयार करण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीनुसार आता रिक्षाची परवाने दिली जाणार आहेत. स्वत: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात आता सर्रासपणे रिक्षा परवाने मिळणार नाहीत. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केल्यानंतर योग्य नियमावली तयार करुन परवाने दिले जाणार आहेत. तोपर्यंत परवाने दिले जाणार नाहीत. मात्र तोपर्यंत परवाने दिले जाणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
“अनेक वर्षांपासून राज्यात रिक्षाचे परवाने खुले केले गेले होते. पण अनेक संघटनांनी, रिक्षा असोसिएशनने मागणी केली होती की, रिक्षांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो. त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की, रिक्षांच्या जास्त संख्येमुळे वाहतूकीची मोठी समस्या निर्माण होते. पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून काही पर्यावरणादींनी देखील याबाबत मागणी केली होती. त्यामुळे मी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होतो. पण केंद्र सरकारची परवानगी नसल्यामुळे आम्ही त्यावर बंदी घालू शकत नव्हतो”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.”मी स्वत: केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना पत्र पाठवलं. त्या पत्राला त्यांचं उत्तर आलं. त्या उत्तराच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले. त्यामुळे आज आरटीओचे आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे जेवढे काही परवाने म्हणजे 11 लाख परवाने दिले गेले होते, आज म्हणजे 9 मार्च पासून दिले जाणारे सर्व परवान्यांना स्थगिती देण्यात आली आहे”, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
“भविष्यात हे परवाने गोर गरिबांना मिळावेत, राज्यामध्ये शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांना उदरनिर्वाहची दुसरे साधने मिळावे. सुशिक्षित बरोजगार आहेत, त्यांना काहीतरी व्यवसायासाठी दुसरे साधन मिळावे या दृष्टीने काही उपाययोजना होत आहेत का, याचा आम्ही विचार करतोय. त्यामाध्यमातून SOP तयार करतोय. त्या SOP च्या आधारे आम्ही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करणार आहोत. कॅबिनेटने बैठकीत जो निर्णय घेतला जाईल त्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत”, अशी देखील महत्त्वाची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा