ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मुख्य मार्ग (मध्य रेल्वे)
स्थानक – ठाणे ते कल्याण
मार्ग – अप आणि डाऊन जलद
वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०
परिणाम – ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक – पनवेल ते वाशी
मार्ग – अप आणि डाऊन
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम – सीएसएमटी ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळ आणि बेलापूर ते नेरूळ व खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. सीएसएमटी ते वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
स्थानक – अंधेरी ते गोरेगाव
मार्ग – अप आणि डाऊन धीमी
वेळ – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. राम मंदिर स्थानकात फलाट उपलब्ध नसल्याने जलद लोकल स्थानकात थांबणार नाहीत. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
दरम्यान, रेल्वे विभागाकडून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीसंदर्भात दिलगिरी व्यक्त कर्यात आली आहे.