• Sat. Sep 21st, 2024
गोवंश वाहतुकीच्या संशयातून ट्रकचा पाठलाग, २० जणांचा तलवार हल्ला, भाजप कार्यकर्त्याचा दावा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : गोवंश वाहतूक करत असल्याच्या संशयातून आयशर ट्रकचा पाठलाग करत विचारपूस करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर तलवार हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे. आयशर ट्रक चालक व किन्नराच्या २० ते २५ साथीदारांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर तलवार, चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. छत्रपती संभाजीनगर येथे घटना घडल्याची माहिती आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ही घटना छत्रपती संभाजीनगरातील केंब्रिज चौकात गुरुवार दि. 25 मे रोजी सकाळी सहा वाजता घडली. आहे. कुणाल मराठे असं जखमी झालेल्या भारतीय जनता पक्षाचा सचिव असलेल्या कार्यकर्त्यांचे नाव आहे.

काकांच्या अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर चौघा भावांचा अपघाती मृत्यू
दरम्यान या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कुणाल मराठे यांना माहिती मिळाली, की छत्रपती संभाजीनगर शहरातील केंब्रिज चौक परिसरातून सिल्लीखाना येथे गोवंश वाहतूक केली जाणार आहे. यामुळे कुणाल पाच ते सहा सहकाऱ्यांसोबत चारचाकी वाहनाने केंब्रिज चौकात गेला.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत २०० पेक्षा अधिक गोवंश सांभाळणारा प्राध्यापक

यावेळी त्या ठिकाणी आयशर ट्रक एम. एच. २० जी. सी. १३४२ ने वाहतूक करण्यासाठी गोवंश घेऊन जात असल्याचे कुणाल मराठे व सहकाऱ्यांच्या लक्षात आलं. यावेळी त्यांनी आयशर चालकाला पाठलाग करून थांबवण्याचा प्रयत्न केला. यावळे गाड्यांची चकमक झाली. काही अंतरावर थांबवून त्यांनी विचारपूस केली. तसेच डायल ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना याबाबत माहिती दिली, असे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.

नदीत आंघोळ करताना पाण्याचा अंदाज चुकला, आईच्या डोळ्यादेखत लेकरु बुडालं
दरम्यान, ट्रक चालकाला विचारले असता त्यांनी हा गोवंश सिल्लीखाना परिसरामध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितलं. यावेळी गोवंश घेऊन जाणाऱ्यांनी त्यांच्या २० ते २५ साथीदारांना बोलावले. तलवार, चाकू घेऊन आलेल्यांनी कुणाल मराठे व त्यांच्या साथीदारांवरती हल्ला केल्याचा आरोप आहे. यामध्ये तिघा-चौघांनी कुणाल मराठे याला तलवार व चाकूने वार करत गंभीर जखमी केलं. यावेळी त्यांनी या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान कुणाल मराठे यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कर्जबाजारी मुलाने आयुष्य संपवलं, आईनेही जीव दिला; मोबाईल मात्र दोस्ताकडे, कुठली गुपितं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed