• Mon. Nov 25th, 2024

    Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले

    Sangli News: गटांगळ्या खाणाऱ्या पुतणीला काकाने वाचवलं, पण पाय घसरला न् दोघं पुन्हा बुडाले

    सांगली : विहिरीमध्ये बुडून काका पुतणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. पुतणीचा जीव वाचवताना काकाचाही प्राण गेला. बुडणाऱ्या पुतणीला काकाने पाण्यातून बाहेर काढलं. मात्र विहिरीबाहेर येताना पाय घसरल्याने दोघेही पुन्हा पाण्यात पडले आणि जीवाला मुकले.पाणी भरण्यासाठी विहिरीत उतरली असताना पाय घसरून बुडणाऱ्या पुतणीला वाचवण्यासाठी गेलेल्या काकाचाही मृत्यू झाला आहे. मनोज भास्कर शेसवरे (वय ४३ वर्ष) आणि सौंदर्या वैभव शेसवरे (वय १६ वर्ष, दोघेही रा. अग्रण धुळगाव) अशी मृत काका पुतणीची नावे आहेत. मनोज हे भारतीय सैन्यात होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते.

    अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या व तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी माय-लेकी दोघीही विहिरीत उतरल्या, मात्र घागर घेऊन वर येत असताना सौंदर्याचा पाय घसरला आणि ती विहिरीमध्ये पडली.

    भवानीमातेच्या दर्शनाहून परतताना मधमाश्यांचा हल्ला, पुण्याच्या कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी
    त्यानंतर सौंदर्याच्या आईने आरडा-ओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी असणारे सौंदर्याचे काका मनोज शेसवरे हे धावून आले आणि त्यांनी विहिरीत उडी घेऊन सौंदर्याला विहिरीतून बाहेरही काढलं, मात्र विहीरीतून वर येताना त्यांचाही पाय घसरला आणि पुन्हा दोघे विहिरीत पडले.

    आई-वडील ऊस तोडायला गेले, मागे लेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

    यावेळी भेदरलेल्या सौंदर्याने काकाला घट्ट मिठी मारली, त्यामुळे शेसवरे यांना काहीच करता आले नाही, त्यामुळे काका-पुतणी हे दोघेही पाण्यात बुडून मृत पावले. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांमध्ये करण्यात आली आहे.

    वावटळीत झोळी ४०० फूट उंच उडाली, दगडावर आदळली; झोपेतच चिमुरडीचा अखेरचा श्वास
    कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दोघांच्याही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *