Mumbai Weather Update 6th March: मुंबईकरांनो, काळजी घ्या…! हवामान खात्याकडून आज उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांत कशी असेल स्थिती? जाणून घ्या
सांताक्रूझ येथे गुरुवारी ३८.९, तर कुलाबा येथे ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी अधिक असल्याने उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आली. प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे समुद्रावरून येणारी हवा अडवली जात असल्याने वातावरणात उष्मा कायम होता. दुपारच्या सुमारास या उष्णतेच्या झळा अधिक जाणवायला लागल्या. ही प्रणाली आज, शुक्रवारी महाराष्ट्रात आत प्रवेश करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रावर होऊ शकतो.
Sharad Pawar : ‘जनतेचा आणि माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी’, राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
कोकण विभागातील तापमानात आज किंचित घसरणीची शक्यता
तर, कोकण विभागातील तापमानात किंचित घसरण होऊ शकते. तरीही शुक्रवारीही महामुंबई परिसरात वातावरण उष्ण जाणवू शकेल, मात्र याची परिणामकारकता गुरुवारएवढी नसेल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी वर्तवली. वीकेंडला तापमानात बुधवार-गुरुवारच्या तुलनेत थोडा दिलासा मिळू शकेल.
Anti-Conversion Bill : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर, मंत्री नितेश राणे यांची माहिती
किमान तापमानाचा पाराही चढा
मार्चच्या तुलनेत सध्या वातावरणात आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पाराही चढा आहे. कुलाबा येथे गुरुवारी २४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे २२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा कुलाबा येथे २.३, तर सांताक्रूझ येथे दोन अंशांनी अधिक होते. वातावरणातील आर्द्रता संध्याकाळच्या वेळेस तुलनेने नियंत्रणात असल्याने कोरडी, उष्ण हवा जाणवत होती.
