• Sun. Jun 7th, 2026

    शिंदेंच्या शिवसेनेचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी; कीर्तिकर-शेवाळेंना मागे टाकत तिकीट

    शिंदेंच्या शिवसेनेचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी; कीर्तिकर-शेवाळेंना मागे टाकत तिकीट

    Rajya Sabha Election : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिवसेनेकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने धक्कातंत्राचा अवलंब करत प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, शायना एनसी अशा पक्षातील दिग्गज नेत्यांची नावं स्पर्धेत असताना तुलनेने नवख्या ज्योती वाघमारे यांच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी वाघमारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ज्योती वाघमारे यांची थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात वर्णी लागल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    कोण आहेत ज्योती वाघमारे?

    सोलापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अभ्यासू आणि आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख निर्माण केली आहे. उच्च शिक्षणाच्या जोरावर समाजकारणात ठसा उमटवणाऱ्या वाघमारे या शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत.

    पीएचडी होल्डर, पाच भाषांवर प्रभुत्व

    दहावीत 84 टक्के गुण मिळवल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी बारावीत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला होता. इंग्रजी साहित्यात पीएचडी मिळवलेल्या ज्योती वाघमारे यांना महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनासाठी राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी यासह तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर प्रभुत्व आहे.
    Maharashtra TimesNCP Merger : दोन्ही पक्षांच्या भावना समजून घेणारा नेताच उरला नाही, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम, जयंत पाटलांचं सूतोवाच
    अधिव्याख्याता म्हणून दहा वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव असलेल्या ज्योती वाघमारेंनी आपल्या कार्याची सुरुवात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीतून केली. काही काळ त्यांनी वृत्त निवेदिका म्हणूनही काम केलं आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही व्याख्यानं दिली आहेत.
    Maharashtra TimesNitish Kumar : बिहारमधील नव्या सरकारला माझा पाठिंबा; नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होण्याचे संकेत

    वडिलांकडून सामाजिक कार्याचा वारसा

    ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केलं आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा ज्योती वाघमारेंनी पुढे चालवला.

    Ritu Tawade | मुंबई प्रदूषित, बिल्डर्सनं नियम पाळले नाहीतर कठोर कारवाई होणार, तावडेंचे आदेश

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा