जिम ट्रेनरवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा
सातारा : जिमसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी जिम ट्रेनरवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. रामसिंग असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित जिम ट्रेनरचे नाव आहे. सातारा शहरातील नावाजलेल्या जिममध्ये असे प्रकार घडल्याने महिलांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.