• Sat. Mar 7th, 2026
    Maharashtra Police: राज्यात मिळेनात पोलिस अधिकारी! तब्बल 241 पदे रिक्त; पदोन्नतीसह नियुक्त्यांचा खोळंबा

    Maharashtra Police: राज्य पोलिस मुख्यालयाने दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या आढाव्यानंतर केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी समोर येत आहे. त्यातच बऱ्याच घटकांत अतिरिक्त कार्यभारामुळे कामकाजाचा खोळंबा होत असून, रखडलेल्या बदल्यांसह नियुक्त्यांमुळे ही स्थिती ओढावली असल्याची पोलिस दलातच चर्चा आहे.

    महाराष्ट्र पोलिस दल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्य पोलिस दलातील विविध घटकांत कार्यरत वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असताना राज्यभरात उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस आयुक्तांची तब्बल २४१ पदे रिक्त आहेत.

    नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात पंचवटी, सरकारवाडा, नाशिकरोड, अंबड, गुन्हे आणि वाहतूक या पदावर सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यरत आहेत. परंतु, आयुक्तालयातील प्रशासन आणि विशेष शाखा ही पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या सहापैकी एक अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून, एकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. यासह सहापैकी तिघांच्या बदलीची शक्यता असली तरी आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर दोघांना मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.

    Maharashtra TimesNashik Accident: आईचा आधार हरपला! पतीचे कोरोनात निधन, कार अपघातात लेकही गमावला, नाशकात 24 वर्षीय तरुणाचा करुण अंत
    राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालयांपैकी सोलापूर, मीरा-भाईंदर आयुक्तालयात एकही पद रिक्त नाही. मात्र, ग्रामीण भागात उपविभागीय पोलिस अधिकारी आणि मुख्यालय स्तरावर अनेक पदे रिक्त आहेत. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीणचे तीन, अहिल्यानगरातील तीन, जळगावचे दोन, नंदुरबारचे एक पद रिक्त आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली दोन, सातारा दोन, सिंधुदुर्गात एक रिक्त आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील बीडमध्ये दोन, जालना व धाराशिवमध्ये प्रत्येकी एक पद रिक्त आहे. यासह रायगड व पालघरमध्ये प्रत्येकी दोन आणि नागपूर ग्रामीणमध्ये एक पद रिक्त आहे. दरम्यान, अकोला, धुळे, मरोळ आणि जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पदे रिक्त आहेत. पोलिस बिनतारी संदेश (वायरलेस) विभागाच्या पुणे आणि इतर केंद्रातील नऊ पदे रिक्त आहेत. तसेच नागरी हक्क संरक्षण विभागाची दहा पदे रिक्त आहेत.

    Maharashtra TimesNashik Crime: नोकरीच्या आमिषाने विवाहितेची दोन लाखांत विक्री; बळजबरीने लग्नही लावले, नाशिकमधील संतापजनक घटना
    पदोन्नतीसह नियुक्त्यांची प्रतीक्षा
    डिसेंबर २०२५ मध्ये राज्यातील विविध संवर्गांतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४४८ निरीक्षकांची यादी केली होती. त्यामध्ये नाशिकच्या २० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी झालेले नाहीत. किंबहुना सहाय्यक पोलिस आयुक्तांनाही उपायुक्तपदाच्या बढतीचे वेध लागले आहेत. विविध घटकांतील अनेक ‘एसीपी’ पदोन्नतीसह नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्याचे विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीची शक्यता आहे. मात्र, २४१ पदांपैकी किती पदे रिक्त राहणार याबाबत पोलिस दलातच चर्चा रंगत आहेत.

    Chhagan Bhujabal | अजित दादांचं विमान झाडाला आदळलं? छगन भुजबळांकडून आश्चर्य व्यक्त; चौकशीची मागणी

    शहरांनिहाय स्थिती
    घटक -मंजूर पदे -रिक्त पदे

    नाशिक शहर –०८ –०२
    मुंबई शहर –१३१ –३५
    पुणे शहर –३५ –०७
    ठाणे शहर –३५ –०४
    नागपूर शहर –३० –०५
    पिंपरी चिंचवड –१५ –०७
    नवी मुंबई –१३ –०२
    अमरावती शहर –१० –०४
    छत्रपती संभाजीनगर –०८ –०१

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा