• Mon. Nov 25th, 2024

    छ. राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान संपन्न, महाडिक पाटील गट आमने सामने, निकालाची प्रतीक्षा

    छ. राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान संपन्न, महाडिक पाटील गट आमने सामने, निकालाची प्रतीक्षा

    कोल्हापूर:जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ९१.१२ टक्के मतदान चुरशीने व अटीतटीनं पार पडलं आहे. संस्था गटात १२९ पैकी १२८ मतदारांनी मतदान केले. तर १३ हजार ५३८ पैकी १२ हजार ३३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज अत्यंत चुरशीने ९१.१२ टक्के मतदान झाले. २१ जागांसाठी सत्तारुढ महादेव महाडीक विरूद्ध सतेज पाटील यांची प्रतिष्ठा यानिमित्ताने पुन्हा एकदा पणाला लागली आहे. दिवसभर कुठेही अनुचित प्रकार घडला नसून केवळ एक-दोन ठिकाणी बोगस मतदान करण्याच्या प्रयत्न फसल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदारांवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले.तर दोन्ही गटाकडून बस भरून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले जात होते. दोन्ही गटांकडून विजयाचा दावा करण्यात येत असून,मंगळवारी मतमोजणीतून याचा फैसला होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

    १२ हजार ३३६ सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क:

    २१ जागांसाठी महाडिक गटांची सत्तारुढ सहकारी आघाडी विरुद्ध सतेज पाटील यांची राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत होत असून,२१ पैकी २० संचालक निवडून देण्यासाठी १३ हजार ४०९ ऊस उत्पादक शेतकरी मतदार तर संस्था गटातील एका संचालकाला निवडून देण्यासाठी १२९ ‘ बं ‘ वर्ग असे एकूण १३ हजार ५३८ सभासद मतदानाचा हक्क बजावणार होते.प्रत्यक्षात दिवसभरात मतदार यादीतील मृत मतदारांची ६३६ नावे वजा करून,प्रत्यक्ष १२ हजार ९०२ मतदारांपैकी १२ हजार ३३६ मतदारांनी मतदान केले असून मंगळवारी,दि.२५ एप्रिल रोजी सकाळी आठ पासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.कायदा व सुव्यवस्थेसाठी मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी आदेश जारी केला आहे.

    बोगस मतदानाचा प्रकार

    महाडिक यांच्या शिरोली गावातील मतदान केंद्रावर बनावट आधार कार्ड वापरून मयत सभासदांच्या नावावरती बोगस मतदान करण्याचा प्रकार आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला.कर्नाटकच्या एकाला याबाबत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तसेच बोगस मतदानासाठी आलेल्या काही जणांचा सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला असता तेही पळून गेले.

    निशा भास्कर लेकीसह माहेरी निघाल्या, पुण्यात बस अपघातात मृत्यू, कोल्हापुरात कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

    महाडिक विरुद्ध सतेज पाटील नेमका कौल कोणाला:

    जिल्ह्यात माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष नेहमीच चर्चेत आहे.लोकसभा,विधानसभा, विधानपरिषद आणि गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांनी महाडिकांना शह देत हातातून काढून घेतले. तर गेल्या 30 वर्षापासून राजाराम सहकारी साखर कारखान्यावर वर्चस्व असलेल्या महादेवराव महाडिक यांच्या हातातून कारखाना काढून घेण्यासाठी सतेज पाटील यांनी चांगलीच ताकद लावली तर कोणत्याही परिस्थितीत कारखाना हातातून सोडायचा नाही म्हणत महाडिक परिवार ही मैदानात उतरल.गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार आणि सभा घेत वैयक्तिक पातळीवर जात टीका करण्यात आली. तर सभासदांना आश्वासनाचे गाजर ही दाखवण्यात आले.सभासद अपात्र आणि त्यांनतर ऐन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दोन्ही गटाकडून बिंदू चौकात येण्याचे आव्हान देत गोंधळ निर्माण करण्यात आला.यामुळे ही लढत अधिक रंगतदार झाली. मात्र आता मतदार राजाने आपलं बहुमूल्य मत हे मतपेटीत टाकला असून कौल कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

    लग्न आटोपलं, वऱ्हाड निघालं, वाटेतच बसचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…

    मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी:

    • कसबा बावडा येथे ९७५पैकी ९१९ (९४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
    • इचलकरंजी मतदान केंद्रावर एकूण १६० पैकी १५५ (९७ टक्के) मतदारांनी मतदान केले.
    • सावर्डे मतदान केंद्रावर सावर्डे, मिणचे व कापूरवाडी या गावांतून २०० पैकी १९८ मतदान (९९ टक्के) झाले.
    • टोप, संभापूर, कासारवाडी येथे ५६४ पैकी ५०५ मतदान (८९.५३ टक्के) झाले.
    • पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील दत्ताजीराव जाधव हायस्कूलमधील मतदान केंद्रावर एकूण १८५ पैकी १६३ (८८ टक्के) मतदान झाले.
    • पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील दत्ताजीराव जाधव हायस्कूलमधील मतदान केंद्रावर एकूण १८५ पैकी १६३ (८८ टक्के) मतदान झाले.
    • कसबा तारळे (ता. राधानगरी) मतदान केंद्रावर 232 मतदारांपैकी 222 मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर कसबा तारळे, पिरळ, सावर्धन, कुडूत्री येथील मतदारांचा समावेश होता.

    रुकडी २८३ पैकी २५५ (९० टक्के) , चोकाक १७६ पैकी १५४ (८७.५ टक्के) , माणगांव १०८ पैकी ९४ (८७.०३ टक्के) या मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या वेळी मतदान केंद्रांना अमल महाडिक, बंटी पाटील, राजूबाबा आवळे यांनी भेटी दिल्या. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

    शेतकरी आत्महत्या ते महागाई, राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल करत चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या सभेतील प्रमुख मुद्दे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed