• Sat. Sep 21st, 2024
लग्न आटोपलं, वऱ्हाड निघालं, वाटेतच बसचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…

चंद्रपूर: लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडींच्या खासगी ट्रॅव्हल्सचा गावाकडे परतताना भीषण अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३५ वऱ्हाडी बसले होते. पळसगाव (चिखलगाव) जवळ ट्रॅव्हल्सचा मागील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅव्हल्स पलटली. या भीषण अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना आज रविवार चार वाजेच्या दरम्यान घडली.

जिल्हातील नागभीड तालुक्यातील नांदगाव येथून वऱ्हाडींना घेऊन ट्रॅव्हल्स निघाली होती. सावली तालुक्यातील गेवरा गावात विवाह सोहळा आटोपून संपूर्ण वऱ्हाड गावाकडे परतले. ट्रॅव्हलमध्ये एकूण ३५ वऱ्हाडी बसले होते. पळसगावजवळ ट्रॅव्हल्सचा मागील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅव्हल्स पलटली. या भीषण अपघातात १४ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

निशा भास्कर लेकीसह माहेरी निघाल्या, पुण्यात बस अपघातात मृत्यू, कोल्हापुरात कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना उपचारासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठलण्यात आले. वारलू कचरू मेश्राम (६०), प्रभाकर गेडाम (५२), शंकर ठाकरे (५०), सदानंद ठाकरे (१७), मयूर गुळधे (२१), आत्माराम निमगडे (६५), लोकनाथ डोंगरवार (५२), भागवत गजभे (७५), प्रकाश मेश्राम (५५), ऋषिजी चांदेकर (४५), श्रीधर चांदेकर (४७), नागेश्वर चौके (२४), प्रफुल दडमल (२४), नितेश गजभे (११) अशी जखमींची नावे आहेत. जखमी झालेले वऱ्हाडी सावरगांव, नांदगांव, तुकुम आणि चिखलगाव येथील आहेत. या अपघाताविषयी पुढील तपास तळोधी पोलीस करत आहेत.

जिल्हात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ…

चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आलं आहे. जिल्ह्यात आज ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. यात चालकासह पाच जण जखमी झालेत. या घटनेला काही तास उलटलेले असताना वऱ्हाडींच्या ट्रॅव्हल्सच्या अपघातात १४ जण जखमी झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

तरुणाने दोन बहिणींना ओढले प्रेमाच्या जाळ्यात, मिळाली अशी शिक्षा, चप्पलने बदडले, त्यानंतर सर्वांसमोर कपडे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed