• Mon. Nov 25th, 2024
    अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण, पण शरद पवार निश्चिंत, कुस्तीच्या आखाड्यात दंग

    बारामती:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे लवकरच पक्षातील काही आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत जातील, अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश ज्येष्ठ आमदारही यावेळी अजित पवार यांच्या बाजूने असल्याची कुजबूज सुरु आहे. तसे घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडू शकते. मात्र, इतक्या सर्व घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मात्र निश्चिंत असल्याचे दिसत आहे. कारण शरद पवार हे सोमवारी बारामतीमध्ये कुस्तीचे सामने पाहायला गेले होते. बारामतीत शारदा प्रांगण येथे भरलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात ते सोमवारी कुस्ती पाहण्यात दंग असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

    यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार,विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, श्रीनिवास पवार, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यावेळी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत बारामती तालुका कुस्तीगीर संघाने शारदा प्रांगण येथे सोमवार दि.१७ रोजी दुपारी २ वा.आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित होते.

    अजित पवार यांची पक्षातच कोंडी, ‘टोकाचा निर्णय’ घेण्यास भाग पाडण्याची खेळी?

    कुस्ती आखाड्याचे उदघाटन उद्योगपती श्रीनिवास बापू पवार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राचा नामांकित मल्ल पै.सिकंदर शेख याने जखमी असल्याने मैदानात सन्मान स्वीकारत कुस्ती खेळणार नसल्याचे सांगितले. यावेळी मैदानात पै.शैलेश शेळके वि पै. माऊली कोकाटे,मुंबई महापौर केसरी पै. भारत मदने वि पै. गणेश जगताप, महाराष्ट्र केसरी पै.बालारफिक शेख वि महाराष्ट्र केसरी पै.हर्षद सदगीर असे नावाजलेले मल्ल मैदानात भिडले. मैदानात २५ पुरुस्कृत कुस्त्या व १२५ नेमलेल्या जंगी कुस्त्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांनी कुस्त्यांच्या मैदानाचे नेटके नियोजन केल्याने,अत्यंत शांततेत व सुज्ञ प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या. यावेळी मैदानात १० हजार कुस्तीप्रेमी उपस्थित होते.तर प्रसिद्ध हालगी वादक राजू आवाळे ग्रुपने आखाड्याची रंगत वाढवली, समालोचन प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर आण्णा पुजारी, प्रशांत भागवत व युवराज यांनी केले.

    मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या खोट्या, अजित पवार यांचं स्पष्टीकरण

    अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा गट फुटून बाहेर पडणार?

    गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थक आमदारांनी आम्ही तशी वेळ पडल्यास अजित पवार यांच्यासोबत जायला तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४० आमदार हे अजित पवारांसोबत असल्याचे सांगितले जाते. या ४० आमदारांच्या समर्थनाची स्वाक्षरी असलेले पत्रही अजित पवार यांच्याकडे तयार आहे. योग्य वेळ आल्यानंतर अजित पवार हे पत्र राज्यपालांकडे देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    राष्ट्रवादीचा गट तयार, अजित दादांच्या सूचनेची प्रतिक्षा, अख्खी महाविकास आघाडीच फोडण्याचा प्लॅन तयार?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed