• Sat. Sep 21st, 2024

पुणेःलग्नाआधीच गर्भवती, टॉयलेटमध्ये बाळाला जन्म देत खिडकीतून खाली फेकले, १९ वर्षांच्या तरुणीचे कृत्य

पुणेःलग्नाआधीच गर्भवती, टॉयलेटमध्ये बाळाला जन्म देत खिडकीतून खाली फेकले, १९ वर्षांच्या तरुणीचे  कृत्य

पुणे:अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाला हॉस्पिटलच्या खिडकीतून खाली फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पुढील धक्कादायक प्रकार म्हणजे या मुलाची आई १९ वर्षांची अविवाहित मुलगी आहे.अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली त्यानंतर तिने बाळाला जन्म दिल्याचं तपासात उघड झालं आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी नऱ्हे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये घडला आहे. याप्रकरणी १९ वर्षे तरुणीवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, १९ वर्षांची असलेली ही तरुणी सिंहगड रस्ता परिसरातील एका वसतिगृहात राहते. शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. दरम्यान आठ महिने झाल्यानंतर ती पाठीच्या आजाराचे कारण सांगून नवले हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. पाठ दुखत असून अशक्तपणा असल्याचे सांगत ती रुग्णालयात दाखल झाली होती. गर्भवती असल्याचे तिने रुग्णालयापासून लपवून ठेवले होते.

जुन्या भांडणाचा राग, महिलेचा विनयभंग करत विष पाजले, पीडीतेची मृत्यूशी झुंज; नातेवाईकांचा दावा
दरम्यान, शनिवारी सकाळी ती नवले हॉस्पिटल मधील कॅज्युअलटी वार्ड शेजारी असणाऱ्या एका स्वच्छतागृहात गेली. तिथे तिने एका बाळाला जन्म दिला आणि काहीही विचार न करता तिने हे बाळ खिडकीतून बाहेर फेकून दिले. या संपूर्ण घटनेत या नवजात बाळाचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करत आहेत.

कार झाडाला धडकून भीषण अपघात, स्वतःला सावरत तिघे कारमधून उतरले, मागे वळून पाहताच बसला धक्का

काळ्या पाठीचे खेकडे अन् गावरान कोंबडी; ग्राहकांना अस्सल जेवू घालण्यासाठी पठ्ठ्याचा भन्नाट व्यवसाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed