• Sat. Sep 21st, 2024

कार झाडाला धडकून भीषण अपघात, स्वतःला सावरत तिघे कारमधून उतरले, मागे वळून पाहताच बसला धक्का

कार झाडाला धडकून भीषण अपघात, स्वतःला सावरत तिघे कारमधून उतरले, मागे वळून पाहताच बसला धक्का

चंद्रपूर:कार झाडाला धडक देत उंचावरून कोसळते अन् पेट घेते. अनेक चित्रपटात असं दृश्य तुम्ही बघितलं असेल. चंद्रपुरात असं प्रत्यक्ष घडलं आहे. चारचाकी वाहनवरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहनाने थेट झाडाला धडक दिली. धडकेनंतर कारने पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणून कारमधील प्रवासी बाहेर पडले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही थरारक घटना सावली तालुक्यातील पाथरी येथील आसोलामेंढा नहराजवळील वळणावर सोमवारला घडली.प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील राहुल रामचंद्र जुमनाके आणि त्यांचे नातेवाईक गौरव कुसराम, सौरव कुसराम हे तिघेही कारने आसोलामेंढा येथे निघाले होते. आसोलामेंढा येथील नातेवाईकांना सोडून ते परत चंद्रपूरला जात असताना पाथरी येथील नहरानजीक चालक राहुल जुमनाके यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कारने थेट झाडाला धडक दिली. या धडाकेत कार मधील तिघांना किरकोळ जखम झाली आहे. धडाकेनंतर तिघे कारच्या बाहेर आलेत. नेमके त्याचवेळी कारने पेट घेतला.

अतिक अहमद- अश्रफच्या हल्लेखोरांवर पोलिसांनी गोळ्या का झाडल्या नाहीत; अखेर कारण समोर
काही क्षणातच कार जळून खाक झाली. घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळ गाठून पुढील तपास पोलीस करीत आहे.चंद्रपूर जिल्हात अपघातांची संख्या वाढली आहे. पोंभुर्णा तालुक्यात रविवारला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतूक नियमांचे पालन काटेकोरपणे करा, अशा सूचना वाहतूक शाखा आणि पोलीस विभागाकडून वारंवार दिल्या जातात. मात्र या सूचनांकडे वाहनचालक गांभीर्याने बघत नाहीत.त्यामुळं अपघातांच्या घटना वाढल्या असे बोलले जात आहे.

फाट्यावर पान खाण्यासाठी गेले, पहाटे परतत असताना कारचा भीषण अपघात, आईने एकुलता एक लेक गमावला

शिक्षक आल्याशिवाय उठणार नाही; संपामुळे मेटाकुटीला आलेल्या विद्यार्थ्यांची भर रस्त्यात शाळा, वाहने अडवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed