• Mon. Nov 25th, 2024

    पावसामुळे घेतलेला आडोसाच ठरला जीवघेणा, पिंपरीत होर्डिंग अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू

    पावसामुळे घेतलेला आडोसाच ठरला जीवघेणा, पिंपरीत होर्डिंग अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू

    पिंपरी:पिंपरी-चिंचवड परिसरात होर्डिंग पडल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पुण्याला लागून असलेल्या किवळे गावात होर्डिंग कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हे होर्डिंग पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावर लावण्यात आले होते. पुणे आणि परिसरात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. घटनेनंतर लगेचच प्रशासनाकडून बचावकार्य जोरात सुरू असून, या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.मुंबई-पुणे हायवेलगत असलेली मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली कोसळले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू, तर तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या होर्डिंगखाली पंक्चरचे दुकान होते. त्यातील व्यक्तीचाही यात मृत्यू झाल्या असल्याची माहिती समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील रावेतमध्ये ही घटना घडली आहे.

    पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांना होर्डिंगचा आडोसा घेतला. मात्र, वादळामुळे अचानक हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आहे.

    पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग क्रेनच्या माध्यमातून होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरु आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed