• Mon. Nov 25th, 2024

    आदित्य ठाकरेंच्या सहकाऱ्याचा युवासेनेला जय महाराष्ट्र, दोन नेत्यांचा उल्लेख करत साथ सोडली

    आदित्य ठाकरेंच्या सहकाऱ्याचा युवासेनेला जय महाराष्ट्र, दोन नेत्यांचा उल्लेख करत साथ सोडली

    मुंबई :महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना सभांद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत असलेल्या साथीदारांसह लढत आहेत. मविआची कालच नागपूरमध्ये मोठी सभा पार पडली. दुसरीकडे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अमेय घोले यांनी युवासेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षातील काही नेत्यांच्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचं घोले म्हणाले.

    अमेय घोले यांचं राजीनामापत्र

    प्रति,

    आदित्य ठाकरे जी,
    शिवसेना नेते / युवासेना प्रमुख.

    प्रिय आदित्य जी,

    मी राजकारणात आलो तुमच्यामुळे. तुम्ही माझ्या वर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली.

    परंतु, वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला.

    राम मंदिरासाठी १ कोटींचं दान दिल्यानं चर्चेत, महंत कनक बिहारी दास महाराजांचा अपघाती मृत्यू,नेमकं काय घडलं?

    याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणुन मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही.

    त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या – कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.

    आदित्य जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो.

    धन्यवाद.

    आपला,

    अमेय अरुण घोले

    चेन्नईच्या संघाला अजून एक मोठा धक्का, धोनीने सांगितले महत्वाचा खेळाडू आज खेळणार नाही

    अमेय घोले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार?

    अमेय घोले जानेवारी महिन्यात झालेल्या युवासेनेच्या बैठकीला देखील हजर राहिले नव्हते. युवासेनेच्या व्हाटसअप ग्रुपमधून देखील ते बाहेर पडले होते, अशी माहिती आहे.

    मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या खोट्या, अजित पवार यांचं स्पष्टीकरण

    गुलाबराव पाटलांच्या कार्यक्रमात बत्ती गुल, लोकांनी लावलेल्या मोबाईल टाॅर्चच्या प्रकाशात १५ मिनिटं भाषण केलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed