शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील नीरश किशन कौल यांनी युक्तिवाद केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : सु्प्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचं प्रकरण आता अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यनेतापदाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी हे पद कायदेशीर नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्यांचा हाच युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांची मुख्यनेतापदी झालेली निवड कशी योग्य आहे? याबाबत कौल यांनी युक्तिवाद केला.
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देताना कोणत्या गोष्टींचा विचार केला आणि त्या देत असताना कुठली पद्धत योग्य ठरली, याबाबत कौल यांनी विश्लेषण केलं. एकीकडे कौल यांच्याकडून वारंवार विधीमंडळ पक्षाच्या संख्येबाबतच्या युक्तिवादावर जोर धरला जात असताना सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्ष पाहून चिन्ह दिलं जातं, अशी महत्त्वाची टिप्पणी केली. यामुळे हे प्रकरण प्रचंड उत्कंठावर्धक वळणावर आल्याचं बघायला मिळत आहे. नीरज किशन कौल यांना आज युक्तिवाद करण्यासाठी केवळ अर्धा तासांचा वेळ मिळाला. आपण उद्या पुन्हा युक्तिवाद करु, असं नीरज किशन कौल यांनी कोर्टात सांगितलं.
नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद काय?
सध्याचा वाद हा एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचा नाही. कोणता मूळ पक्ष हा सध्या मुद्दा आहे. शिंदे यांनी आमदार आणि मंत्री म्हणून जे काम केलं ते लोकप्रतिनिधी म्हणून केलं. त्यावर आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला. पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला.
पक्षाला चांगल्या उत्तरदायित्वाची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंच्या वेळी ही अपेक्षा पूर्ण झाली नसल्याचं दिसून येतं. ठाकरेंनी पक्षाला स्वत:च्या वैयक्तिक व्यवस्थेप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद कौल यांनी केला. तसेच कार्यकर्त्याला पक्षात काय सुरु आहे यावर बोलण्याचा अधिकार आहे. तसेच पक्ष संघटना कशी चालावी यावर बोलण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला.
निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिंदेंना पक्ष दिला?
केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं, याबाबत नीरज किशन यांनी युक्तिवाद केला. “पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी तीन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये पहिली टेस्ट पक्षाची घटना होती. दुसरी संघटना होती आणि तिसरी विधीमंडळ पक्ष होती. तिसरी टेस्ट महत्त्वाची आहे, कारण पूर्वीच्या दोन टेस्टमध्ये समस्या आहेत”, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
यावेळी कौल यांनी 2018 ची पक्षाची घटना ही निवडणूक आयोगाला देण्यात आली नव्हती, असा युक्तिवाद केला. तसेच पक्षाच्या संघटनेबाबत बोलायचं झालं तर पक्ष हा एकाधिकारशाहीत होता. त्यामुळे विधीमंडळ पक्षाची संख्या पाहून निर्णय घेण्यात आला, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी
विधीमंडळ पक्ष ही महत्त्वाची चाचणी आहे, असं नीरज कौल म्हणाले. “संघटनेत दोन तृतीयांश पेक्षा जास्त लोक नियुक्त होत असतील तर पक्षात लोकशाही कुठे आहे? ही तर एकाधिकारशाही झाली ना?”, असे सवाल कौल यांनी युक्तिवादात केले. यावर “आपण इथे न्यायिक आढावा घेण्यासाठी बसलोय”, अशी महत्त्वाची टिपण्णी कोर्टाने यावेळी केली.
कौल यांच्याकडून सादिक अली केसचा दाखला
“निवडणूक आयोग ही एक महत्त्वाची संस्था आहे. निवडणूक आयोगाने पक्ष, चिन्ह देताना पडताळलेल्या बाबी योग्य आहेत. चिन्हाचा निर्णय देताना विधीमंडळ पक्षाची संख्या महत्त्वाची आहे. सादिक अली केसमध्येही याचा स्पष्ट उल्लेख आहे”, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला.
कोर्टाची मोठी टिप्पणी आणि कौल यांचं स्पष्टीकरण
जेव्हा विषय चिन्हाचा आहे तेव्हा राजकीय पक्ष महत्त्वाचा आहे, असं सुप्रीम कोर्ट म्हणालं. त्यावर नीरज कौल यांनी अगदी, मी सहमत आहे. पण विधीमंडळ पक्षाची चाचणी हीच आणि एकमवे महत्त्वाची चाचणी आहे, असं मी म्हटलेलं नाही, असं नीरज किशन कौल म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या मुख्यनेता निवडीवर युक्तिवाद
“निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाची मान्यता रद्द करु शकत नाही. मात्र पक्षांचा वाद आयोगाकडे गेल्यास ते निर्णय घेऊ शकतात”, असा युक्तिवाद कौल यांनी केला. “एकनाथ शिंदेंची मुख्यनेता म्हणून झालेली निवड चुकीची नव्हती. प्रतिनिधी सभेने ठराव करुन शिंदेंना मुख्यनेते म्हणून नेमले आणि पक्षातील संविधान दुररुस्त करण्यात यावे, अशी मागणी केली. त्याचे सर्व मिनिट्स उपलब्ध आहेत”, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
“निवडणूक आयोगाने विधीमंडळ पक्ष चाचणी ही सर्वात मोठी चाचणी म्हटलेलं नाही. शक्य त्या सर्व चाचण्या घ्या असं आयोगाने म्हटलं आहे”, असा युक्तिवाद कौल यांनी केला. “2018 च्या घनेनुसार पक्षाच्या घटनेनुसार नेतृत्व एककेंद्र झालं होतं. पक्षात लोकशाहीपेक्षा सत्ताकेंद्र तयार करण्यात आले होते”, असा आरोप कौल यांनी युक्तिवादात केला. यानंतर आजची सुनावणी संपली. आपण उद्या पुन्हा युक्तिवाद करु, असं कौल कौर्टात म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा