Chhagan Bhujbal : ते सर्वांनाच बोलतात, छगन भुजबळांची टीका; मनोज जरांगे यांना सांगून सगळे थकले
जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या सरकारच्या वतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. पण जरांगे यांनी त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा न केल्याने त्या निराश झाल्या. जरांगे सध्या कुणालाच सोडत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट या सगळ्यांना शिव्या देतात. जरांगे यांची ही भाषा राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. जरांगे यांना सांगून सांगून सगळे थकले, आता मी काय बोलणार, अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांच्या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे.