Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काल शुक्रवारी एक भयानक घटना उघडकीस आली आहे. दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 4 जणांनी संपवलं आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पिकअप वाहनावर चालक म्हणून काम
हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं. गंभीर जखमी बोराडे यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. तानाजी बोराडे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअप वाहनावर चालक म्हणून काम करत होते. एमएच 12 केपी 5626 क्रमांकाच्या वाहनातून ते दररोज परिसरातील दूध संकलित करून खर्डा येथे आणत होते. शुक्रवारीही नेहमीप्रमाणे दूध वाहतूक केल्यानंतर ते आपल्या कामासाठी निघाले होते. याचदरम्यान काही व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतलं.
Manoj Jarange : मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यास आडकाठी नाही, प्रतिबंध करण्यास उच्च न्यायालयाचा नकार; कोर्ट काय म्हणालं?
एकापाठोपाठ सपासप वार
फाट्याजवळ पोहोचताच बोराडे यांचा संशयितांशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर मारामारी सुरू झाली. काही कळण्याच्या आतच एका हल्लेखोराने हातातील कोयत्याने बोराडे यांच्या मानेवर जोरदार वारकेले. एकापाठोपाठ झालेल्या वारांमुळे बोराडे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून धूम ठोकली. मुख्य रस्त्यालगत भरदिवसा घडलेल्या या हत्येनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी बोराडे यांना तातडीने रुग्णवाहिकेतून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं.
Nashik Crime : चुलत बहिणीच्या लग्नात पतीकडून अपमान; डॉ मनिषा जेजुरकर यांनी जीव दिला नव्हे, हत्येचा संशय; हायकोर्टाच्या निरीक्षणाने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट
हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले असून, न्यायवैद्यक पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, बोराडे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? हत्येमागे जुने वैमनस्य आहे की अन्य काही कारण आहे? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. भरदिवसा गर्दीच्या रस्त्यालगत कोयत्याने वार करून झालेल्या या हत्येनं खर्डा परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस करत आहेत.
