• Mon. Sep 14th, 2026

Pune Ring Road: गेल्या दीड वर्षापासून ‘डीपी’ची प्रक्रिया सुरू असतानाच ११७ गावे पुन्हा देण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,पुणे:पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या बाह्यवळण रिंग रोडभोवतीच्या ११७ गावांच्या विकासाला आता नियोजनाचा ‘नकाशा’ मिळणार आहे. या गावांचा सविस्तर विकास आराखडा ( डीपी ) तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वेगाने सुरू असून, अस्तित्वातील जमिनींच्या वापराचे सर्वेक्षण (ईएलयू) पूर्ण झाले आहे.

डीपी तयार करण्याचे उद्दीष्ट

भविष्यातील विकासासाठी आवश्यक प्रकल्प आणि त्यासाठी लागणाऱ्या जागांचे नियोजन (पीएलक्यू) अंतिम टप्प्यात असून, येत्या चार महिन्यांत डीपी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

‘एमएसआरडीसी’ला जबाबदारी

या ११७ गावांचे ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून‘एमएसआरडीसी’ला सुमारे दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने जबाबदारी दिली. हवेली, भोर, पुरंदर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यांतील या गावांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्याचा आराखडा तयार केला जात आहे.

जमिनींच्या वापराचे नियोजन

११७ गावांच्या ‘डीपी’मध्ये पुरंदर विमानतळाजवळील सासवड आणि सिंहगड किल्ला परिसर ही दोन ग्रोथ सेंटर केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहेत. रिंग रोडमुळे या भागांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर होणारे नागरीकरण, व्यवसाय आणि पर्यटनवाढ लक्षात घेऊन जमिनींच्या वापराचे नियोजन केले जाणार आहे.

जागा आरक्षित करण्याचे नियोजन

मुळशीचा बहुतांश भाग डोंगर-दऱ्यांचा असल्याने या भागात पर्यटनाला विशेष प्राधान्य देण्याचा विचार आहे. त्याचबरोबर औद्योगिक हब, लॉजिस्टिक पार्क यांसारख्या सुविधांसाठी योग्य जागांचा शोध घेतला जात आहे. केवळ रस्ते आणि बांधकामांपुरता ‘डीपी’ मर्यादित न ठेवता पाणीपुरवठ्याच्या टाक्या, क्रीडांगणे, खुल्या जागा, स्मशानभूमी, अग्निशमन केंद्रे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्याचे नियोजन आहे.

Maharashtra TimesST Bus: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; ‘लाल परी’चा ताफा वाढणार, तब्बल पाच हजार नवीन बस धावणार

भविष्यातील वाहतूक गरजा

जागा निश्चितीसाठी ड्रोन सर्वेक्षणही केले जाईल. रिंग रोडच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांचा गावांच्या विकासावर होणारा परिणामही ‘डीपी’मध्ये विचारात घेतला जात आहे. विद्यमान ११७ गावांच्या आराखड्यात मेट्रोचा समावेश नसला, तरी भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन त्याचा विचार होऊ शकतो.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा