• Fri. Sep 18th, 2026

Nashik Traffic Update: नाशिकमध्ये एसटी बसच्या मार्गांत बदल; पोलिसांची अधिसूचना, द्वारकासह मुंबई नाकावरुन वाहतूक वळवली, कसे आहे नियोजन?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: निमाणी बसस्थानकावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने १४ ते २१ सप्टेंबर दरम्यान या स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस मेळा, नवीन सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकावर स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत. यासह द्वारका उड्डाणपुलाखालील रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून बसेसच्या मार्गांत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

पुढील टप्प्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत निमाणी बसस्थानकात काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत आहे. त्यामुळे तेथील बस फेऱ्या मेळा व नवीन सीबीएस येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे. त्यानुसार द्वारका उड्डाणपुलाखालून मुंबई नाका आणि आडगावकडे जाणारी व येणारी वाहतूक सुरू असल्याने एसटी बसलेला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे.

Mumbai Ganeshotsav 2026: विघ्नहर्त्याची कृपा‘वृष्टी’! गणरायाच्या स्वागताचा उत्साह शिगेला; मंगलमय वातावरणात भक्तिरंगाची उधळणबसेसचा सुधारित मार्ग

छत्रपती संभाजीनगरकडे : निमाणी बसस्थानक काट्यामारूती चौकातून स्वामीनारायण चौक-नांदूरनाका शिलापूर टोलनाका पुढे येवला, छत्रपती संभाजीनगरकडे

निमाणीकडे : शिलापूर टोलनाका – नांदूरनाका – स्वामीनारायण चौकातून अमृतधाम चौक तारवाला सिग्नल – दिंडोरी नाकामार्गे निमाणी बसस्थानक

धुळे व जळगावकडे : मेळा बसस्थानकातून जुने जिल्हा परिषद कार्यालय – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल – मुंबईनाका उड्डाणपुलाखालून वडाळानाकामार्गे द्वारका – स्वामीनारायण चौक – अमृतधाम – बळीमंदिर चौकातून आडगावमार्गे मालेगाव, धुळे व जळगावकडे

शिवाजीनगराकडे (पुणे), शिर्डी, अहिल्यानगर : मेळा बसस्थानकातून गडकरी सिग्नल – मुंबई नाका सर्कल – इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे साईनाथ सिग्नल – रविशंकर मार्ग – फेम सिग्नल – उपनगर सिग्नल – दत्तमंदिर सिग्नल – सिन्नर फाटामार्गे पुढे शिवाजीनगर (पुणे).

मेळा बस स्थानक व नाशिककडे : सिन्नर फाटा – बिटको सिग्नल – सम्राट सिग्नल – डीजीपनगरमार्गे वडाळागाव कलानगर सिग्नल – लेखानगर सिग्नल – इंदिरानगर बोगदा – मुंबई नाका – गडकरी सिग्नल – मेळा बसस्थानक

पेठ, दिंडोरी, सप्तशृंगी गड : ठक्कर बाजार बसस्थानक – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल – – मुंबई नाका उड्डाणपुलाखालून वडाळानाकामार्गे निमाणी बस स्थानकासमोरून दिंडोरी नाकामार्गे पुढे पेठ, कळवण, सप्तशृंगी गडाकडे

मुंबई व कसारा : महामार्ग बसस्थानक – मुंबईनाका सर्कल – इंदिरानगर बोगदा – लेखानगर – पाथर्डीफाटा – गरवारे पॉईंटमार्गे कसारा व मुंबईकडे जातील व येतील.

Maharashtra TimesFDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचनाबसस्थानक व बस फेऱ्या
निमाणी : येवला, लासलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, बुलढाणा व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या
मेळा : कोल्हापूर, सांगली, सातारा, शिवाजीनगर (पुणे) मार्गावरील व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या. तसेच मालेगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जळगाव, चोपडा, धुळे, शिरपूर, शहादा, सुरत, वापी व इंदोर व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या
नवीन सीबीएस (ठक्कर बाजार) : त्र्यंबकेश्वर, सिन्नर, व
इगतपुरी परिसरातील ग्रामीण फेऱ्या. तसेच पालघर विभागातील फेऱ्या व त्र्यंबकेश्वर-पुणे, नंदुरबार, साक्री, सटाणा, वलसाड, कळवण, पेठ, सप्तशृंगीगड, सुरगाणा, मार्गावरील ग्रामीण वाहतूक
महामार्ग : शिर्डी, अहिल्यानगर व कसारा, मुंबई मार्गावरील व पुढे जाणाऱ्या सर्व फेऱ्या

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed