शेवगा खुर्दचे रहिवासी प्रकाश किसन डोंगरदिवे (वय ४८) यांच्या फिर्यादीवरून गावातील स्मशानभूमीच्या जागेवरून दोन समाजामध्ये वाद आहे. १० सप्टेंबरच्या सायंकाळी एका गटातील महिला व पुरुषांनी लाठ्याकाठ्यांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढविला. जातिवाचक शिवीगाळ करून धमक्या देत समाजातील लोकांना मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश मधुकर पिवतकार (वय ३०), गजानन मधुकर पिवतकार (वय ३२), निंबाजी आडे (वय ४०), ओम निंबाजी आडे (वय २२), मधुकर मेनकार (वय ३७), हर्ष मधुकर मेनकर (वय १९), शुभम विष्णू सोनोने (वय २३), मनोज विष्णू सोनोने (वय ३०), अभिजीत विष्णू सोनोने (वय २५), भगवान गोपाळ सोनोने (वय ५०), सौरभ भगवान सोनोने (वय २२), केशव बाबन सपकाळ (वय ४५), सूर्यकांता निंबाजी आडे (वय ३५), राधाबाई विष्णू सोनोने (वय ५०), इंदूबाई भगवान सोनोने (वय ४९), शालिनी गजानन पिवतकार (वय २७), गायत्री गणेश पिवतकार (वय २२), निशा मनोज सोनोने (वय २५), विजयकांता मधुकर मेनकार (वय २०) व प्राची भगवान सोनोने (वय २०) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
Crime News: दिवसाढवळ्या थरार! मेडिकलमध्ये घुसून २२ वर्षीय तरुणाला संपवलं, तरण्याबांड मुलाच्या मृत्यूने कुटुंबाला धक्कादुसऱ्या गटातील अभित विष्णू सोनोने (वय २३) याने दिलेल्या तक्रारीवरून वीस जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. स्मशानभूमीच्या जागेवरून काठ्या आणि सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने डोक्यावर, छातीवर, हातावर, खांद्यावर व पाठीवर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. आरोपींमध्ये आनंदा किसन डोंगरदिवे, विकी रमेश खंडेराव, आदित्य कैलास डोंगरदिवे, आकाश कैलास डोंगरदिवे, प्रकाश किसन डोंगरदिवे, रमेश महादेव खंडेराव, गौतम राष्ट्रपाल वानखडे, सचिन देविदास वानखडे, धम्मपाल किसन डोंगरदिवे, कैलास किसन डोंगरदिवे, किसन आकाराम डोंगरदिवे, प्रवीण विश्वपाल वानखडे, रोहित ज्ञानदेव मेहेरे, नलिनी प्रकाश डोंगरदिवे, चंदा कैलास डोंगरदिवे, अंतकला किसन डोंगरदिवे, कविता आनंदा डोंगरदिवे, रमा धम्मपाल डोंगरदिवे, देवाबाई रमेश खंडेराव व अक्षय रमेश खंडेराव यांचा समावेश आहे.
Pune Crime : ऑनलाइन गेमिंग अन् बेटिंगच्या विळख्यात अडकून आयुष्य संपवलं, पुण्यातील MPSC करणाऱ्या प्रथमेश देशमुख प्रकरणात नवीन माहितीजखमींना अकोल्याला हलविले
हाणामारीत दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाले. यातील गणेश पिवतकार, मधुकर पिवतकार, भुरा सोनोने, प्रदुम्न सोनोने, गणेश सोनोने यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आले.
