Mumbai Ganeshotsav 2026: छत्र्या आणि रेनकोटच्या आडून मुंबईकरांनी बाजारपेठ गाठत गणेशोत्सवासाठीची शेवटच्या टप्प्यातील खरेदी उरकली.
गणेशोत्सवाच्या आगमनासाठी अवघी मुंबई सज्ज होत असताना रविवारी पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही. मात्र, त्याचा भक्तांच्या खरेदीउत्साहावर तसूभरही परिणाम जाणवला नाही.
FDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचनागणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच खरेदीची लगबग दिसून आली. घरातील गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, तोरणे, विद्युत रोषणाई, आरास करण्यासाठीच्या वस्तू यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ‘पाऊस कितीही असला तरी गणेशोत्सवाची तयारी थांबवता येत नाही. यंदा घरची आरास थोडी वेगळी करायची आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत खरेदी सुरू आहे’, असे स्वप्नील पिकुळकर यांनी सांगितले. काही ठिकाणी दुकानदारांनी साहित्य भिजू नये म्हणून दुकानांसमोर प्लास्टिकचे आच्छादन केले होते. सजावटीच्या वस्तू आणि पूजेचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठीही विशेष काळजी घेतली जात होती.
गणेशोत्सवासाठी घराची सजावट करण्यासाठी यंदा पारंपरिक वस्तूंसोबत विविध आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी खरेदी करणाऱ्यांनाही आपल्या पसंतीनुसार साहित्य निवडता येत आहे. फुलांची सजावट, आरास, तोरणे आणि रोषणाईच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
Mumbai Bridge Closure: मुंबईतील चार पादचारी पूल बंद; गणेशोत्सव पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय“पावसामुळे खरेदीवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र, सकाळपासून ग्राहक येत आहेत. विशेषतः पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी शेवटच्या क्षणी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे,” असे संदीप शिंदे या अंधेरीतील विक्रेत्याने सांगितले.
पावसामुळे मिरवणूक किंवा विसर्जन धोकादायक ठरण्याची शक्यता असल्यास परंपरा आणि वेळेचा आग्रह न धरता पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून निर्णय घ्यावा. मोठ्या मंडळांनी आपत्कालीन पथक तयार ठेवून संपर्कासाठी जबाबदार व्यक्ती नियुक्त करावी. –अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
