Ghodbunder Road : घोडबंदर रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला; रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांची कामे अपूर्णावस्थेत
रस्ता रुंदीकरणानंतर घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुसाट झाली असली, तरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांची कामे मात्र अपूर्णावस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पदपथांची कामे रखडल्याने पादचाऱ्यांना थेट मुख्य रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी थेट पदपथावरूनच गाड्या चालवल्या जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.