• Wed. Sep 9th, 2026

CSMT–Sawantwadi train: गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असला तरी बहुतांशी कोकणकरांना अजून गावी जाण्यासाठी तिकीट काही मिळालेल नाही. अशातच रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली सीएसएमटी – सावंतवाडी गाडी एक आशेचा किरण ठरतेयं. पण अद्याप ही गाडी सुरू न झाल्याने कोकणकर मात्र प्रतीक्षेतच आहे .

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,पनवेल:कोकणवासीयांची अनेक दिवसांपासून सुरू असलेली रेल्वेगाडीची मागणी अखेर पूर्ण झाली. मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी ही नवी रेल्वेसेवा उद्घाटनानंतर मात्र पुन्हा धावलेली नाही.

पनवेलमध्ये राजकीय पक्षांकडून स्वागत

गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या या रेल्वेचे ठाणे आणि पनवेलमध्ये राजकीय पक्षांकडून स्वागत झाले. परंतु प्रवाशांना झालेला आनंद अवघ्या काही तांसांमध्ये विरला आहे. ही गाडी नेमकी कधी सुरू होणार? त्याचे आरक्षण कधी करता येणार याकडे कोकणवासींचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी

मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड तसेच पुणे परिसरातील कोकणवासीयांसाठी ही रेल्वे अत्यंत सोयीची ठरणार आहे. त्यामुळे कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रवाशांची गरज ओळखून ३ सप्टेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ही रेल्वे सुरू करण्यात आले.

३ सप्टेंबरला झाले होते उद्घाटन

मंत्र्यांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत ३ सप्टेंबरला दुपारी उद्घाटन झालेली सावंतवाडी रेल्वेगाडी मागील पाच दिवसांत पुन्हा धावलीच नाही. त्यामुळे रेल्वेचे नियोजन नसताना केवळ उद्घाटनाचा भूलभुलय्या कशासाठी करण्यात आला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गावाकडे जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध

मुंबई आणि उपनगरांतील प्रवाशांबरोबरच ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील कोकणवासीयांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. येत्या गणेशोत्सवात या गाडीला गर्दी होण्याची शक्यता आहे. परंतु , अद्यापही रेल्वेचे आरक्षण सुरू झालेले नाही. रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर गाडीच दिसत नसल्याचे प्रवासी सांगत आहेत. एक महिन्यापुर्वी मंजुरी दिलेली विशेष गाडी सावंतवाडीपर्यंत रिकामीच धावली होती.

Maharashtra Timesscrap rickshaw: बदलापूर, अंबरनाथमध्ये स्क्रॅप रिक्षांचा सुळसुळाट; विनापरवाना,अल्पवयीन चालक चालवतात रिक्षा, प्रवाशांचा जीव धोक्यात

वेळा कोणत्या ?

मुंबईहून सावंतवाडीला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून १५०८७ क्रमांकाची रेल्वेगाडी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वादोन वाजता सावंतवाडीला पोहोचेल. पुन्हा मुंबईकडे जाण्यासाठी सावंतवाडीहून ही रेल्वेगाडी (१५०८८)सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुटेल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोहोचेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा