योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. उपोषणामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावत असतानाही जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता लक्षात घेता राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील 4 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन, पाणी आणि इतर वैद्यकीय उपचार घेणे बंद केले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. उपोषणस्थळी उपस्थित डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. काल रात्री मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संवादानंतर जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सहमती दर्शवल्याची माहिती आहे. त्यानंतर मध्यरात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास उपोषणस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज अकरावा दिवस असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अन्न-पाण्यासह वैद्यकीय उपचारांबाबतही कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रकृती खालावल्यानंतरही उपोषणाचा निर्णय आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर त्यांची भूमिका अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर रात्री वर्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध मंत्र्यांची बैठक पार पडली. यामध्ये जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी काय पावले उचलली जावीत, याबाबत सविस्तर विचारमंधन करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित असून, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच समर्थकांमध्येही चिंता निर्माण झाली होती. आता मध्यरात्री उपचार घेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला असला, तरी त्यांची प्रकृती आणि पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा