• Thu. Sep 10th, 2026

Pratibha Naik : चार मुलींना शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं वडिलांचं स्वप्न होतं. ते मुलींना दररोज दुचाकीने शाळेत ने-आण करत असत. मुलींना मोठे अधिकारी होताना पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून नाईक कुटुंबाची रोजची धडपड सुरु असताना झालेल्या अपघाताने त्यांचे स्वप्न भंगले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : शाळेतून मुलींना घरी घेऊन निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरची धडक बसून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय प्रतिभा नाईक हिचा मृत्यू झाला. तिची मोठी बहीण वैष्णवी (वय १७) हिच्या दोन्ही पायांवरून कंटेनरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. मंगळवारी (आठ सप्टेंबर) दुपारी कात्रज-कोंढवा रस्त्यावर राजस सोसायटी चौकाजवळील कपिला दूध डेअरीसमोर हा अपघात घडला. कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यूटर्न घेताला ट्रेलरची दुचाकीला धडक

प्रतिभा आणि वैष्णवी कात्रज- कोंढवा रस्त्यावरील खासगी शाळेत शिकत होत्या. देविदास नाईक त्यांच्या दोन मुलींना शाळेतून घेऊन दुचाकीवरून गुजर- निंबाळकरवाडीच्या दिशेने घरी निघाले होते. कोंढव्याकडून खोपडेनगरच्या दिशेने जात असताना कपिला दूध डेअरीजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्याने त्यांना यू-टर्न घ्यावा लागला. त्याच वेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक बसून, दुचाकी कंटेनरखाली गेली.

दोन्ही मुलींना रुग्णालयात नेलं

यात प्रतिभा ट्रेलरखाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्याने देविदास यांना किरकोळ दुखापत झाली. वैष्णवी मात्र ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य करून, दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केले.

Maharashtra TimesBaramati Crime : महिलेच्या झुंबा क्लास विरोधात तक्रार, कारवाई टाळण्यासाठी 7 लाखांची लाच मागितली, बारामतीत पोलीस हवालदाराला रंगेहाथ अटकअपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली; तसेच अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दुसरीच्या उपचारांची चिंता

अपघाताची माहिती मिळताच नाईक कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. प्रतिभाची बॉडी ससून रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आली आहे. एका मुलीला गमावल्याचे दुःख आणि दुसऱ्या मुलीच्या उपचारांची चिंता, अशा दुहेरी संकटात कुटुंब सापडले आहे. वैष्णवीच्या उपचारांचा खर्च कसा भागवायचा, याची चिंता कुटुंबीयांना आहे. त्याचबरोबर उर्वरित दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही नाईक दाम्पत्यासमोर आहे.

Maharashtra TimesRakesh Mehta : दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरी बॉडी सापडली, चिठ्ठीतून कारणांचा उलगडा

अपघाताने सारे हिरावले, पोलिस अधिकारी होण्याचे प्रतिभाचे स्वप्न अधुरे

चार मुलींना शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे वडिलांचे स्वप्न होते. ते मुलींना दररोज दुचाकीवरून शाळेत ने-आण करीत. मुलींना मोठे अधिकारी होताना पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून नाईक कुटुंबाची रोजची धडपड सुरू होती. मात्र, मंगळवारच्या अपघाताने त्यांचे स्वप्न भंगले. भरधाव ट्रेलरखाली सापडून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय प्रतिभा नाईक हिचा मृत्यू झाला. पोलिस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले.

नाईक कुटुंब १५-१६ वर्षांपासून गुजर-निंबाळकरवाडी परिसरात वास्तव्यास आहे. देविदास नाईक एका शाळेत रखवालदार म्हणून काम करतात, तर त्यांच्या पत्नी बालवाडीत साफसफाईचे काम करतात. त्यांना चार मुली आहेत. चारही मुलींसाठी स्वतंत्र स्कूल व्हॅनची व्यवस्था करणे शक्य नसल्याने मुलींना शाळेत सोडणे आणि शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी आणण्याची जबाबदारी देविदास यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.

मंगळवारीही शाळा सुटल्यानंतर प्रतिभा आणि वैष्णवी यांना घेऊन घरी जात असताना हा अपघात झाला. प्रतिभा आणि वैष्णवी अभ्यासात हुशार होत्या. प्रतिभाला पोलिस अधिकारी व्हायचे होते. वैष्णवीला चित्रकलेची विशेष आवड होती. मुलींनी मोठे होऊन चांगले भविष्य घडवावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती.

Maharashtra TimesRohan Parekh : रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी कोट्यवधी खर्च

कात्रज–कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे आणि काम पूर्ण करण्याच्या वारंवार घोषणा होऊनही नागरिकांना सुरक्षित आणि सलग रस्ता मिळत नसल्याचे चित्र आहे. अपूर्ण रुंदीकरण, खड्डे, रस्त्यातच कायम असलेले विजेचे खांब, रखडलेले भूसंपादन आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे बदललेली वाहतूक व्यवस्था यामुळे या मार्गावरील प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे.