• Wed. Sep 9th, 2026

Pimpri Chinchwad Crime News : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण काही करता कमी होत नाहीय. याचदरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रेमविवाहाच्या रागातून एका युवकावर जीवघेणा हल्ला केला आहे.

सांगवी प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर हल्ला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर धारदार लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार सांगवी परिसरात समोर आला आहे. हल्लेखोरांनी तरुणाच्या डोक्यावर तसेच हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केलं आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींपैकी एकाने पिस्तुल काढून तरुणाच्या दिशेने रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

प्रेमविवाहाचा राग मनात

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, काल मंगळवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विशालनगर, पिंपळे निलख येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार अमोल अण्णासाहेब वीर (वय 33) हे हॉटेल व्यवसाय करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सायली काळूराम लांडगे हिच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाचा राग मनात धरून तिचे चुलते अनिल पांडुरंग लांडगे यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संदीप तानाजी लांडगे आणि रोहन अर्जुन लांडगे यांनी अमोल वीर यांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर धारदार लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. संदीप लांडगे याने अमोल यांच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागांवरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अमोल वीर गंभीर जखमी झाले आहेत.

Maharashtra TimesRohan Parekh : रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

‘पिस्तुल काढ, याचा जीव घे…’

हल्ल्यादरम्यान आरोपी रोहन लांडगे याने संदीपला पिस्तुल काढून अमोल यांचा जीव घेण्यास सांगितल्याचा तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. यानंतर संदीपने कमरेला लावलेलं पिस्तुल बाहेर काढून अमोल यांच्या दिशेने रोखलं. अमोल वीर यांच्यासोबत त्यांचे भाऊ अनिकेत सदाशिव वीर आणि दीपक नानासाहेब वीर यांनाही मारहाण करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी अमोल वीर यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

Maharashtra TimesBaramati Crime : महिलेच्या झुंबा क्लास विरोधात तक्रार, कारवाई टाळण्यासाठी 7 लाखांची लाच मागितली, बारामतीत पोलीस हवालदाराला रंगेहाथ अटक

चार आरोपींविरोधात गुन्हा

या प्रकरणी सांगवी पोलिसांनी संदीप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काशीनाथ लांडगे आणि अनिल पांडुरंग लांडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कासारवाडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले दोन लोखंडी कोयते, एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमविवाहाचा राग… त्यातून थेट कोयता आणि पिस्तुलाचा वापर… या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी आरोपींना सांगवी पोलिस कधी बेड्या ठोकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा