• Wed. Sep 9th, 2026

Gondia News: आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला. आंदोलकांची संख्या वाढू लागल्याने गोंदिया-बालाघाट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या गुदमा-प्रतापबाग या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचा बाजारभाव तीन कोटी रुपयांपर्यंत आहे. बाजारभावाच्या पाच पट मोबदल्याची शेतकऱ्यांची मागणी असतानाही रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना केवळ १९ हजार ९३० रुपये प्रति हेक्टरचा दर दिला जात आहे.

हा अन्याय असल्याचा आरोप करीत सुमारे १२ गावांतील शेतकरी सोमवारी एकत्र आले. त्यांनी गोंदिया-बालाघाट मार्गावरील कटंगी नाका चौकात रास्तारोको आंदोलन करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. या आंदोलनाने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाची स्थिती चिंताजनक; मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळ निवारण पॅकेजची मागणी, कोणत्या भागात कशी आहे स्थिती?भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक करावी, बाजारभावानुसार मोबदला द्यावा, शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी किसान जमीन बचाओ संघर्ष समिती च्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कटंगी कला, नागरा, हलबी टोला, सावरी, गर्रा, गोंदिया खुर्द, पोवारी टोला, दतोरा, खमारी, चुलाद यांसह परिसरातील इतर गावांतील शेतकरी सहभागी झाले. सरकारकडून आपल्या मागण्यांसंदर्भात दखल घेतली जात नसल्यावरून या गावांमध्ये रोष असल्याने गावकरी एकत्र येऊ लागले. सकाळपासून गावातून निघालेले हे शेतकरी दुपारच्या सुमारास कटंगी नाका परिसरात एकवटले. महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांनी भजन गात, काळे रुमाल आणि काळ्या फिती बांधून शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदविला.

संघर्ष समितीच्यावतीने अखिलेश सेठ, प्रा. अमित बुद्धे, राजेश नागरिकर, नंदू बिसेन, कार्तिक चव्हाण, मोहिनी वराडे, गोल्डी गावंडे, गोपाळ चुटे यांच्यासह अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Maharashtra TimesManoj Jarange: मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम, 12 सप्टेंबरच्या बैठकीत अंतिम निर्णय घेणारबैठकीत एकमुखाने अमान्य

कटंगी कला येथे २३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सर्व भूधारकांनी रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला मोबदला अमान्य करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला होता. हा मोबदला अन्यायकारक असून, शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आणणारा असल्याचा आरोप समितीने केला. त्यानंतरही प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने रास्तारोको आंदोलन करण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा