• Thu. Sep 10th, 2026

PM Narendra Modi BKC Event Security Breach : पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून तोतया अधिकारी आणि त्याचे सुरक्षारक्षक आतमध्ये शिरल्याचे प्रकरण चर्चेत आहे. मात्र रोहन पारेखला आपण पीएमओसाठी काम करतो, असे भासवण्यात आले होते, असा दावा त्याच्या वकिलांनी केला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ वर्ल्ड प्लाझाची सुरक्षा तिघांनी भेदल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिओ सेंटरमधील कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून तोतया अधिकारी आणि त्याचे सुरक्षारक्षक आतमध्ये शिरले. त्यांच्याकडे एक परवाना असलेले पिस्तुल सापडले. याप्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहन पारेख आणि दिलीप कुंदे या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र रोहनला आपण पीएमओसाठी काम करतो, असे भासवण्यात आले होते, असा दावा त्याच्या वकिलांनी केला.

भारत सरकारचे आयडी दाखवून प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये तीन व्यक्तींनी पंतप्रधान कार्यालय, भारत सरकार असे लिहिलेले ओळखपत्र दाखवून शिरल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने या ठिकाणी जाऊन खासगी सुरक्षा रक्षक सनी सिंग याच्याकडे चौकशी केली.

सीसीटीव्ही फुटेजची झाडाझडती

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिघे पिस्तुलसह आले. थांबविले असता त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र दाखविले. त्यावर तिघांचा फोटो पाहून आतमध्ये सोडल्याचे सिंग याने पोलिसांना सांगितले. सिंग याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची झाडाझडती घेतली.

यावरून कारचा क्रमांक आणि त्याला लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलिस खार येथील रोहन पारिख (२४) या तरुणापर्यंत पोहोचले. त्याने जिओ प्लाझामध्ये गेल्याचे मान्य करीत आपल्यासोबत दिलीप कुंदे आणि मित्र प्रथमेश बागुल हे दोघे होते अशी माहिती दिली. रोहन याच्याकडे पिस्तूल असून त्याचा परवाना देखील आहे.

Maharashtra TimesRakesh Mehta : दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरी बॉडी सापडली, चिठ्ठीतून कारणांचा उलगडाप्रकरण गंभीर असल्याचे तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. वांद्रे कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून रोहन आणि दिलीप यांना अटक करण्यात आली.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी संबंध नाही

जिओ वर्ल्ड प्लाझा हा मॉल असून यासाठी सर्वांना प्रवेश असतो. परंतु खासगी सुरक्षा रक्षक तपासणी करूनच आत सोडतात. त्यामुळे या प्रकारचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान हे कृत्य त्यांनी कशासाठी केले? त्यांनी सादर केले ओळखपत्र प्रथमदर्शनी बनावट वाटत असून यावर जारी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र संपण्याची मुदत अथवा तारीख नसल्याचे समोर आले आहे.

रोहन पारेखच्या वकिलांचा धक्कादायक दावा

रोहन पारेख याला आपण खरोखरच पंतप्रधान कार्यालयासाठी काम करत आहोत असे वाटायला लावून कदाचित त्याचीच फसवणूक केली गेली असावी, असे त्याच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले. बीकेसीतील कार्यक्रमाच्या ठिकाणी सोमवारी घडलेल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबईतील न्यायालयाने रोहनला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Maharashtra TimesGuwahati Murder : नवविवाहित बायकोला संपवलं, जेलबाहेर आलो तर तिच्या शुगर डॅडीचाही काटा काढेन, नवऱ्याचा इशारा, अनैतिक संबंधातून घटनारोहनच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तरुण कपूर नावाच्या व्यक्तीने रोहन पारेखला पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी देऊ केली होती. तसेच, त्याला सल्लागारपदाची (ज्यात महक गुप्ता याचाही सहभाग होता) ऑफर देण्यात आली होती. तरुण गुप्ता नावाच्या व्यक्तीकडून रोहनला ‘संरक्षण खरेदी धोरणा’बाबत एक ई-मेलही प्राप्त झाला होता, असा दावाही वकिलांनी केला.

बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार, रोहन पारेखला एक ऑफर लेटर, ओळखपत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असल्याचे भासवणारे एक पत्र मिळाले होते. तसेच, त्यांना पंतप्रधानांच्या एका अतिरिक्त सचिवाकडूनही ई-मेल प्राप्त झाला होता.

Maharashtra TimesBaramati Crime : महिलेच्या झुंबा क्लास विरोधात तक्रार, कारवाई टाळण्यासाठी 7 लाखांची लाच मागितली, बारामतीत पोलीस हवालदाराला रंगेहाथ अटकवकिलांनी असा युक्तिवाद केला की, हे सर्व पत्रव्यवहार रोहन पारेखला खरे वाटले होते आणि त्यामुळे आपण अधिकृतपणे पंतप्रधान कार्यालयाशी जोडले गेलो आहोत, असा त्याचा समज झाला होता. बचाव पक्षाने सांगितले की, रोहन पारेखनेआपल्याकडील सर्व कागदपत्रे आणि पत्रव्यवहाराची माहिती तपास अधिकाऱ्याकडे सोपवली होती, तसेच पडताळणीसाठी पंतप्रधान कार्यालयाला आपल्या संपर्काची माहितीही दिली होती, असे वकिलांनी सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा