• Sat. Sep 5th, 2026

Maharashtra Weather Update : राज्यात चालू महिन्यात १४ टक्के पाऊसतूट, कोकणात सप्टेंबरअखरपर्यंत प्रतीक्षा

सप्टेंबर पहिल्या आठवड्याच्या अखेरीस देशात सरासरीपेक्षा १३ टक्के पावसाची तूट असून, राज्यात १४ टक्के तूट आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीच्या स्थितीमध्ये फारशी सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या पुढच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार ही माहिती देण्यात आली आहे. ३ सप्टेंबरपासून १० सप्टेंबरपर्यंतच्या आठवड्यामध्ये राज्यभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल. त्यानंतर विदर्भाला फायदा होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे विदर्भाला फायदा मिळू शकतो. त्या पुढच्या आठवड्यांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजाबद्दल खात्री कमी असली तरी नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाडा आणि कोकणाला फायदा होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed