• Sat. Sep 5th, 2026

Eknath Shinde: SRAचे दोन अधिकारी निलंबित; जोगेश्वरीतील प्रकल्पात सदनिका वाटपप्रकरणी कारवाईचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

Eknath Shinde: फोर्स वनच्या मुख्यालय जागेसाठी सातबारा वेगळा करण्यासाठी म्हाडाने मदत करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : जोगेश्वरी, गोरेगाव या भागांत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिका वाटपात पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश एसआरए प्राधिकरणाला दिले. ओशिवरा व्हीलेज येथील प्रकल्पात अपात्र लोकांना घरे वाटप केल्याप्रकरणी संबंधित दोषी एसआरए सक्षम प्राधिकारी, सहायक निबंधक या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

कायमस्वरूपी संक्रमण शिबिर (पीटीसी) इमारती विकासकाने एसआरएकडे हस्तांतरित न केल्याच्या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी प्रश्न, पुनर्विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढावा बैठक झाली. यावेळी खासदार रवींद्र वायकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बोरीकर, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता, सहायक आयुक्त आदी या बैठकीत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Maharashtra TimesKalwa FDA Action: कळवा रुग्णालयातील कँटीन बंद, जेवणात झुरळ आढळल्यानंतर FDAची कारवाईयावेळी खासदार वायकर यांनी आपल्या मतदारसंघातील भगतसिंग नगर १,२,३, दुर्गानगर, कोयना वसाहत, मेघवाडी, सर्वोदय सोसायटी, ओशीवरा व्हीलेज येथील एसआरए प्रकल्पांबाबत तक्रारी केल्या. पात्र लाभार्थ्यांना सदनिका वाटप न करता बोगस व्यक्तींना त्यांचे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, असे निर्देश प्राधिकरणाला दिले. तसेच ज्या एसआरए प्रकल्पातील घरांचे वाटप झाले आहे, परंतु त्याबाबत तक्रारी आहेत त्या सर्वांचा आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Maharashtra TimesDahi Handi 2026: दृष्टीआडची जिद्द, थरांवरची भरारी! 2017पासून महिला गोविंदांची परंपरा; यंदा तीन थरांचे आव्हान पेलणार‘हरे रामा, हरे कृष्णा’ स्थानक

मेट्रो मार्गिका क्रमांक २ ब येथील पूर्व पश्चिम स्थानकास जोडणाऱ्या स्थानकाचे ‘हरे रामा, हरे कृष्णा’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. जोगेश्वरी गुंफांचा पर्यटन विभागामार्फत सर्वांगीण विकास केला जावा, यासाठी निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा