Nagpur Congress Corporator Shubham Motghare Firing Case : नागपूरमधील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर २६ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.
५००हून अधिक सीसीटीव्हींची तपासणी
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘मटा’ने गुरुवारच्या अंकात ‘गोळीबार करणारे कुठे लपून बसले’, या आशयाच्या वृत्तातून या प्रकरणाला वाचा फोडली होती. २६ ऑगस्टच्या मध्यरात्री श्रावणनगर परिसरातील मोटघरे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोन मुखवटाधारी व्यक्तींनी एक गोळी झाडली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे खांडवानी टाउन रोडवरील स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने पळून जाताना दिसले. या प्रकरणाच्या तपासासाठी सात पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलिसांनी ५००हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संशयितांची ओळख पटविण्यात आली. तसेच २५ हजारांहून अधिक कॉल रेकॉर्ड, टॉवर डम्प आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. ५० हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा मागही पोलिसांना लागला.
Crime News : मैत्रिणीशी भांडण, 26 वर्षीय पुणेकर तरुणाचा गोव्यात हृदयद्रावक अंत, शेजारी मदतीला धावेपर्यंत अनर्थ
छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून अटक
अंकुश तोमसकर (३०) याने गोळी झाडल्याचे तपासात समोर आले. त्याला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून अटक करण्यात आली. ऋषभ ऊर्फ छोटू नागदेवे याने दुचाकी चालविल्याचे पोलिसांनी सांगितले. अमित ठाकरे, रोमित ऊर्फ पुल्या वाहणे, ऋषभ पैठल, केतन माटे आणि कार्तिक तोमसकर यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ८० हजार रुपये किमतीचे आठ अँड्रॉइड मोबाइल जप्त करण्यात आले. एका अमली पदार्थ विक्रेत्याने या गोळीबाराची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. नगरसेवकाला धमकावण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबार केवळ धमकीसाठी होता की मोठ्या कटाचा भाग, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख व पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या चमूने केली.
Mumbai Dahi Handi : ‘गोविंदा रे गोपाळा’; मुंबई आज सकाळपासूनच ‘गोविंदा’मय! उंचीच्या ‘थर’थराटाला आयोजकांचे बळ, 11 थरांसाठी बक्षिसांची होणार लयलूट
बायकोच्या मृत्यूचं गूढ उकललं
नागपूरच्या मानकापूर परिसरात 38 वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचं नाव कृष्णलाल शिवराम यादव (वय 41) असं आहे. तर मृत महिलेची ओळख यामिनी कृष्णलाल यादव (वय 38) अशी झाली आहे. यामिनी या पती कृष्णलाल यादव याच्यासोबत मानकापूर येथील झिंगाबाई टाकळी परिसरातील गोविंद सिटी टॉवरमध्ये राहत होत्या.
