• Sat. Sep 5th, 2026

Pimpri Chinchwad Woman Dies : राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु आहे. याचदरम्यान, पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये या उत्सवाला गालबोट लागलेला आहे. लोखंडी कमान कोसळून एका महिलेचा येथे मृत्यू झाला आहे.

सांगवी लोखंडी रॉड पडून महिलेचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात दहीहंडी उत्सव साजरा होत असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेली लोखंडी कमान काढत असताना त्याचा लोखंडी भाग महिलेच्या अंगावर पडल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण, (वय 45), असं मृत महिलेचं नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवी परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी उत्साहात पार पडली. उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. याचवेळी सलमा पठाण या आपल्या पतीसोबत घटनास्थळी उभ्या होत्या. लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू असतानाच अचानक लोखंडी भाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.

Maharashtra TimesNagpur Crime : 500 सीसीटीव्ही फुटेज, 25 हजार कॉल रेकॉर्ड, काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरेंच्या घरावर हल्ला; गोळीबाराचं खरं कारण समोर

मृत महिलेचा मुलगा दहीहंडी मंडळात

घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनं जुन्या सांगवी परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी केली. चौकशीदरम्यान मृत महिलेचा मुलगा याच दहीहंडी मंडळात असल्याचं समोर आलं. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मंडळातील इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, तसेच मृत महिलेचा मुलगाही याच मंडळाशी संबंधित असल्याने, कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

Maharashtra TimesCrime News : मैत्रिणीशी भांडण, 26 वर्षीय पुणेकर तरुणाचा गोव्यात हृदयद्रावक अंत, शेजारी मदतीला धावेपर्यंत अनर्थ

दुर्घटनेमुळे उत्सवाला गालबोट

तसंच, पोलिसांनीही स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केल्याचं सांगण्यात येत आहे. दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा होत असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे मात्र उत्सवाला गालबोट लागलं आहे. एका कुटुंबाने आपली आई आणि पत्नी गमावली आहे. उत्सव संपल्यानंतर काही क्षणांतच आनंदाचं वातावरण दुःखात बदललं आणि जुन्या सांगवीवर शोककळा पसरली. उत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या लोखंडी कमानी, सांगाडे आणि इतर संरचना काढताना योग्य ती खबरदारी घेतली जातेय का, सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत का, असा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा