• Sat. Sep 5th, 2026

Mumbai Local: मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक, कोणत्या लोकलवर परिणाम? खोळंबा टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक

मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान आणि पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केला आहे.

मध्य रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग : अप आणि डाऊन धीमा

वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, २० मिनिटे विलंबाने धावतील.

Eknath Shinde: SRAचे दोन अधिकारी निलंबित; जोगेश्वरीतील प्रकल्पात सदनिका वाटपप्रकरणी कारवाईचे एकनाथ शिंदेंचे निर्देशहार्बर रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम : ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते वाशी /बेलापूर/पनवेलदरम्यान आणि सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉकवेळेत पनवेल ते कुर्लादरम्यान २० मिनिटांच्या फरकाने विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावर वेळापत्रकानुसार लोकल उपलब्ध राहणार आहेत.

Maharashtra TimesDahi Handi 2026: दृष्टीआडची जिद्द, थरांवरची भरारी! 2017पासून महिला गोविंदांची परंपरा; यंदा तीन थरांचे आव्हान पेलणारपश्चिम रेल्वे

स्थानक : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

मार्ग : अप आणि डाऊन जलद

वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

Maharashtra TimesAir India : सुरक्षेशी तडजोड नाही! हवेत गटांगळी घेणाऱ्या विमानाचा पायलट नशेत, एअर इंडियाकडून हकालपट्टी, सहवैमानिक सुटलालोकल फेऱ्या वाढणार

‘मुंबई लोकलची वाढती प्रवासी संख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे तीन हजार २०० लोकल फेऱ्यांची संख्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३०पर्यंत ३,५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे,’ अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई – सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed