• Fri. Jul 24th, 2026

    Yavatmal Farmer Ends Life: आधी दोन मुलांनी जीवन संपवलं अन् आता वडिलांनी मृत्यूला कवटाळलं; शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त, घटनेनं जिल्ह्यात हळहळ

    Yavatmal Farmer Ends Life: आधी दोन मुलांनी जीवन संपवलं अन् आता वडिलांनी मृत्यूला कवटाळलं; शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त, घटनेनं जिल्ह्यात हळहळ

    Yavatmal Farmer Ends Life: नापिकी, कर्जाचा भार आणि आर्थिक विवंचना यामुळे ते मानसिक तणावात होते, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

    यवतमाळ शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: सततची नापिकी, वाढते कर्ज, पीकविम्याची मदत न मिळणे आणि शेतीसाठी वीजजोडणीला झालेला विलंब या तणावातून राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथील शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. ज्ञानेश्वर मालेकर (वय ६२), असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या दोन मुलांनीही यापूर्वी जीवन संपवलं होतं. आता त्यांच्याही जाण्याने मालेकर कुटुंबावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला आहे.

    ज्ञानेश्वर यांच्याकडे पाच एकर शेती आहे. सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी त्यांनी बोअरवेल केली. वीज जोडणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून डिमांडची रक्कमही भरली. मात्र, जोडणी न मिळाल्याने त्यांची चिंता वाढली.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: छत गळतंय, विद्यार्थी पाणी काढतायत; फुलंब्रीत ZP शाळेचं धक्कादायक वास्तव, शिक्षण विभागावर संताप
    चार वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा निखिल मालेकर (वय २८) याने जीवन संपवलं होतं. त्यानंतर दुसरा मुलगा तपवीन (वय २६) वडिलांना शेतीत मदत करीत होता. त्यानेही दोन वर्षांपूर्वी जीवनयात्रा संपवली. यामुळे ज्ञानेश्वर खचले होते; तरीही कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी शेती सुरू ठेवली होती. या घटनेने पिंपळापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    दरम्यान, ‘२०२४मध्ये शासनाच्या आदेशानुसार सोलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. काही शेतकऱ्यांनी सोलर बसविले. ज्यांनी रक्कम भरली नाही, त्यांना जमा पैसे परत केले. मालेकर यांच्या प्रकरणात काय झाले, याची माहिती घेतो’, असे महावितरणच्या यवतमाळ मंडळाचे अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

    तर दुसऱ्या एका घटनेत, देवळा तालुक्यातील वाखारी (पिंपळगाव) येथील विवाहितेने आपल्या दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. वर्षा जयेश वाघ (वय ३१), तिच्या दोन मुली सिद्धी (वय ७) आणि खुशी (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी जयेश रमेश वाघ, रमेश चिंतामण वाघ, सुनंदा रमेश वाघ, विकी वाघ व सविता अजित बच्छाव यांच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesBMC FDA Action: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन सील, काय कारण?
    सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा
    कोल्हापूर : राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या नावाखाली राज्यातील तमाम शेतकऱ्यांची माकडचेष्टा चालवली असून, ही शुद्ध फसवणूक आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ते म्हणाले, थकीत कर्जदारांना केवळ दोन लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना अवघे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले. हा राज्यातील कोट्यवधी कर्जदार शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा