Mumbai Sachin Ahir House Theft : शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून 2 लाख 65 कोटींची जबरी चोरी झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सचिन अहिर घरी २ कोटी ६५ लाखांची चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या मुंबईतील निवासस्थानी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्याच घरात धाडसी चोरी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. अहिर यांच्या घरातून तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी सचिन अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेत रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
2 कोटी 65 लाखांचा ऐवज गायब
सचिन अहिर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा कोट्यवधींची रक्कम एकाचवेळी नव्हे, तर टप्प्याटप्प्याने चोरीला गेली आहे. घरातील मौल्यवान वस्तू कमी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकाराचा आढावा घेतला. तपासादरम्यान घरातील तब्बल 2 कोटी 65 लाखांचा ऐवज गायब झाल्याचं उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चोरी झालेल्या कोट्यवधींच्या मुद्देमालात अत्यंत मौल्यवान ऐवजाचा समावेश आहे. यात सोन्याची बिस्कीटे, हिऱ्यांचे महागडे दागिने, चांदीची मौल्यवान भांडी आणि रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती आहे. या धाडसी चोरीमागे सचिन अहिर यांच्या घरात काम करणाऱ्या एका विश्वासू नोकराचाच हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. Mumbai Police: मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य; संताप आणणारा व्हिडिओ समोर, कठोर कारवाईची मागणी
24 वर्षांपासून नोकर म्हणून काम
पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणात घरातील नोकर प्रवाणी रमेश सोलंकी याला अटक केली आहे. तो गेल्या 24 वर्षांपासून अहिर यांच्या घरात काम करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी याने चोरीचा माल विकल्याची आणि त्यातून मिळालेले पैसे साथीदारांमध्ये वाटल्याची कबुली दिली आहे. सचिन अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. गुन्हे शाखेचे डीसीपी राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सचिन अहिर यांचा मुलगा कृष्णा अहिर हे कुटुंबासह वरळी सी फेस येथील गुलरुख इमारतीत राहतात. प्रवीण सोलंकी हा गेल्या 24 वर्षांपासून तिथे साफसफाई करत होता. जुना नोकर असल्याने त्याला वरळीतील कार्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. छ.संभाजीनगरमधील प्रसिद्ध ‘उत्तम उपहार गृह’वर FDAचा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, तुकाराम मुंढेंचा आदेश अन् परवाना रद्द
लोकप्रतिनिधीच्या घरातच जबरी चोरी
घरातील मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत आणि कधी कोणाची ये-जा असते, याची पूर्ण माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसून तपास सुरू आहे. मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याच्या आणि घटनात्मक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातच एवढी मोठी चोरी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा