• Wed. Sep 9th, 2026

PM Modi : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळावरुन दोन संशयित ताब्यात, एकाकडे सापडली बंदूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधी कार्यक्रमस्थळाहून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी एकाकडे बंदूक सापडली आहे. तर एकाकडे PMO कार्यालयाचं बनावट ओळखपत्र आढळलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. नरेंद्र मोदी मुंबईत ज्या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्या बीकेसी येथील नीता अंबानी कल्चरल सेंटरमधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी एका संशयिताकडे बंदूक आढळली आहे. रोहन पारेख असं एका संशयिताचं नाव आहे. हा रोहन स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचं सांगत होता. त्याच्याकडे PMO कार्यालयाचं बनावट ओळखपत्र देखील आढळलं आहे.

सुरक्षा तपासणीत संबंधित ओळखपत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी या रोहन पारीखला ताब्यात घेतलं आहे. हा रोहन पारेख स्वत:सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरत होता. त्या कथित बॉडीगार्डकडे बंदूक सापडली आहे.

संशयितांचा नेमका उद्देश काय?

पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. मुंबई क्राईम ब्रांचकडून दोघांच्या कोठडीची मागणी कोर्टात केली जाईल. यानंतर मुंबई क्राईम ब्रांचकडून या प्रकरणी सखोल तपास केला जाईल. दोन्ही संशयित नेमकं कोणत्या उद्देशाने मोदी हजर राहणार असणाऱ्या कार्यक्रमस्थळी आले होते? त्यांचा काही घातपात घडवण्याचा कट होता का की वेगळं काही कारण होतं? या सगळ्यांचा तपास आता केला जाणार आहे. एका संशियताकडे बंदूक आढळल्याने हे प्रकरण जास्त संवेदनशील बनलं आहे. त्यामुळे या प्रकरणात काय-काय माहिती समोर येते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Maharashtra TimesNarendra Bhondekar : महायुतीत नाराजीच्या चर्चा, शिंदेंच्या आमदाराला काँग्रेसची ऑफर, नरेंद्र भोंडेकर यांची पहिली प्रतिक्रिया

रोहनच्या बॉडीगार्डकडे परवाना असलेली बंदूक

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 24 वर्षीय रोहन पारीख हा आपल्यासोबत असलेल्या बॉडीगार्डसह नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये प्रवेश करत होता. त्याने पीएमओ कार्यालयाचं बनावट ओळखपत्र दाखवत सुरक्षा भेदूत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत असलेली व्यक्ती त्याचा बॉडीगार्ड असल्याचा दावा त्याने केला आहे.

Maharashtra TimesRadha Patil : दहीहंडीचा कार्यक्रम राधा पाटीलच्या अंगाशी, नृत्यांगनेवर गुन्हा दाखल; काय घडलं?रोहनच्या कथित बॉडीगार्डकडे सापडलेली बंदूक ही परवाना असलेली आहे. असं असलं तरी रोहनचा या कार्यक्रमात येण्याचा नेमका उद्देश काय होता? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखेकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेकडून दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली जाणार आहे.

Maharashtra TimesAhilyanagar News : भाऊच बनला शत्रू, शेतातून कांदा आणला म्हणून बहिणीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये शरमेने मान खाली घालणारी घटना

पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांचा आज गुजरातच्या बडोद्यात दौरा आहे. तिथला कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी मुंबईच्या दिशेला येणार आहेत. ते संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5.45 वाजेच्या सुमारास ग्लोबल फिटनेक फेस्टचे उद्घाटन होणार आहे. मुंबईत 8 ते 11 सप्टेंबर या काळात ग्लोबल फिटनेक फेस्टचे आयोजन करण्यात आलं आहे.