Pune Fight Between Two Girl Over Boyfriend : पुणे तिथे काय उणे! पुणे शहरात कधी काय होईल याचा काही भरवसा नाही. गावगुंड किंवा महाविद्यालयातील तरुणांची मारामारी हा प्रकार काही विशेष नाही. पण शहरात तरुणींच्या दोन टोळत्या हाणामारी करत असतील तर हे खूप धक्कादायक आहे. या मारामारीचा विषय होता तो फक्त एका तरुणीने दुसऱ्या तरुणीच्या बॉयफ्रेंडला केलेला मेसेज, या क्षुल्लक कारणावरुन शहरात दोन तरुणींमध्ये घमासान झालं असल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
एका तरुणीच्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या तरुणीनं मेसेज केला. याचाच राग मनात धरुन संबधित तरुणी मेसेज केलेल्या तरुणीजवळ गेली, आणि ‘माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलास?’ असा जाब विचारला. या वादावादीचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. सुरुवातीला दोघांमध्ये सुरु असणाऱ्या या वादात आणखी काही मुली सामील झाल्या. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात दोन मुलींच्या टोळ्या आपापसात भिडल्या असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Kopargaon Crime : चारित्र्यावर संशय घेत बायकोचा जीव घेतला, नंतर स्वत:ला संपवलं, घराच्या भिंतीवर ‘त्या’ तिघांची नावं; महाराष्ट्र हादरला
पुण्यात कोयता गँगची दहशत
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीय. हत्या, बलात्कार, कोयता गँग असा प्रकारच्या घटनांचा अक्षरश: उच्छाद मांडला आहे. असाच एक संतापजनक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्याचा राग चौघा जणांच्या टोळक्याने कोंढव्यातील मिठानगर रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर काढला. ३ रिक्षा आणि २ कारच्या काचा फोडून त्यांनी परिसरात दहशत माजवली. कोंढवा पोलिसांनी रात्रीतून चौघांपैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
Akola News : बैलांच्या आंघोळीसाठी नदीवर, पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीत पडला, बैल काठावर हंबरत राहिले, पण शंतनू…
या घटनेनबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अतिक अहमद शेख (वय ४८, रा. मिठानगर, कोंढवा) या रिक्षाचालकाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी घराबाहेर रिक्षा पार्क करुन ते घरात झोपले होते. आज मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास तीन ते चारजण दुचाकीवरुन आले. त्यांनी तोंडाला मास्क लावलं होतं.

