Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death : घटनेच्या दिवशी चेतनने वापरलेला मोबाईल फोन त्याच्या नावावर नोंदणीकृत नसून तो नीरज कुमारच्या मालकीचा असल्याचे समजते
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केतन अग्रवाल याचा खून केतनची नियोजित वधू आणि तिच्या मित्रांनी मिळून केल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यानंतर केतनची नियोजित वधू सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक झाली. या घटनेनंतर सियाच्या वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आणि त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. तर नीरज कुमार नावाच्या चौथ्या व्यक्तीची या प्रकरणात एन्ट्री झाली असून तो साक्षीदार होणार की संशयित, हे अस्पष्ट आहे.
चेतनने घेतला नीरजचा मोबाईल
तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, डिजिटल पुराव्यांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, घटनेच्या दिवशी चेतनने वापरलेला मोबाईल फोन त्याच्या नावावर नोंदणीकृत नव्हता. हा फोन नीरज कुमारच्या मालकीचा असल्याचे समजते. तो चेतन चौधरीच्या हाताखाली काम करत होता. चेतनने मुद्दाम स्वतःचा फोन घरी ठेवून नीरजचा फोन सोबत घेतला. नीरजला चौकशीसाठी बोलावण्यात आले असून त्याला या घटनेची माहिती किंवा कटात सहभाग आहे का, याची पडताळणी होत आहे.
सियाच्या अल्लडपणावरुन दुर्लक्ष
लोहगड मृत्यू प्रकरणातील तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याने साखरपुड्यानंतर भावी पत्नी सिया गोयलबाबत कुटुंबीयांकडे अनेकदा शंका व्यक्त केली होती. मात्र, नात्यातील मुलगी असल्याने आणि वयाने लहान असल्यामुळे तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करावे, अशी कुटुंबीयांनी त्याची समजूत घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. Rakhi Agarwal : माझ्या घरी ड्रिंक चालत नाही, पार्टीलाही पाठवणार नाही; केतनच्या आईने बजावलेलं, सियाच्या 3 गोष्टींमुळे राखी अगरवालना संशय केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, साखरपुड्यानंतर केतनने एकदा वडिलांना, ‘तुम्ही सियाबाबत संपूर्ण माहिती घेतली आहे का,’ असा थेट प्रश्न विचारला होता. त्या वेळी नातेवाइकांच्या ओळखीतून हे स्थळ आले असल्याने तिच्याबाबत खात्री असल्याचे कुटुंबीयांनी त्याला सांगितले. त्यानंतर सहा जूनला बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जाण्याचा कार्यक्रम पासपोर्ट गहाळ झाल्याने रद्द झाला. घरी परतल्यानंतर सिया किरकोळ कारणांवरून वारंवार वाद घालत असल्याचेही केतनने वडिलांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
Jalana | आम्ही रक्ताचं पाणी करून बंडू जाधवांना निवडून दिलं, पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी
सियाचं अफेअर असल्याचा केतनला संशय
१४ जूननंतर पुन्हा एकदा केतनने कुटुंबीयांशी संवाद साधताना सियाचा फोन अनेकदा व्यग्र लागत असल्याचे आणि ती सतत चेतन चौधरी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करीत असल्याचे सांगितले. तिचे बाहेर कोणासोबत प्रेमसंबंध असावेत, अशी शक्यताही त्याने व्यक्त केली होती. मात्र, विशाल अगरवाल, त्यांची मुलगी संजना आणि भाऊ विजय यांनी सिया ही नात्यातील मुलगी असल्याने तसे काही नसावे, असे सांगून केतनची समजूत काढली. वय लहान असल्यामुळे तिच्या वागण्यात अपरिपक्वता असू शकते, असे सांगून कोणताही गैरसमज करून घेऊ नको, असा सल्लाही त्याला दिल्याचे विशाल अग्रवाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. Pune Crime : केतनला फरफटत नेऊन दरीत ढकललं? लोहगडाच्या गवतावर संशयास्पद खुणा, चेतन-सियाशी झटापट झाल्याचाही अंदाज
पासपोर्ट केला फ्लश
केतन आणि सियाचे प्री-वेडिंग शूट बाली (इंडोनेशिया) येथे करण्याचे नियोजन होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात दोघे परदेशात जाणार होते. मात्र, मुंबईला पोहोचल्यानंतर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचे समोर आले आणि संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला. तपासात, बालीला जाण्यासाठी केतन आणि सिया पुण्यातून मुंबईला निघाले होते. वाटेत फूड मॉलवर सियाने केतनचा पासपोर्ट स्वच्छतागृहात फ्लश केला. त्यामुळे केतनच्या घातपाताचे नियोजन आरोपींनी आधीपासूनच केले होते का, असा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा